Improved banana cultivation by Kapil jachak. आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान-कपिल जाचक.
Ganna Master
0:00 / 0:00
Improved banana cultivation by Kapil jachak. आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान-कपिल जाचक.
126 474 просмотра · 7 л. назад
Ganna Master
144 тыс. подписчиков
126 474 просмотра · 7 л. назад
. कपिल जाचक यांची जवळपास तीस एकर बागायती जमीन असून त्यांच्या शेतात केळी हे मुख्य पीक आहे. त्यासोबत डाळिंब आणि ऊस ही देखील पिके ते घेतात. केळी पिकात जवळपास अठरा ते वीस वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी असून केळी उत्पादनात खूप सारे नवनवीन तंत्रज्ञान त्यांनी वापरले आहे. 24 महिन्यात जवळपास 110 टन केळीचे उत्पादन ते घेतात ( लागण आणि खोडवा,निडवा अशी तीन पिके).
केळी पिकात त्यांनी जोड ओळ पद्धत वापरून एका एकरात जवळपास 1450 रोपे बसवली आहेत. जोड ओळी मध्ये दोन ओळीतील अंतर साडेतीन फूट असून नंतरच्या मुख्य दोन ओळीतील अंतर 12 फूट आहे. केळीचा खोडवा देखील ते पाचव्या महिन्यातच पकडतात. याच पद्धतीतून त्यांनी तब्बल 92 किलोचा घड उत्पादित केला आहे.
होय आम्ही शेतकरी समूहतर्फे लवकरच केळी पिकावर चर्चासत्र आयोजित करत आहोत. सदरच्या चर्चासत्रामध्ये आपणास कपिल जाचक यांच्या शेतीला भेट देता येईल.