मतिमंद मुला-मुलींसाठी कार्यरत अनिकेत सेवाभावी संस्था | Special Story | Special children's
Media World News Network
0:00 / 0:00
मतिमंद मुला-मुलींसाठी कार्यरत अनिकेत सेवाभावी संस्था | Special Story | Special children's
7 307 просмотров · 5 л. назад
Media World News Network
54,6 тыс. подписчиков
7 307 просмотров · 5 л. назад
Media World News
अनिकेत सेवाभावी संस्था ही एक मानसिक गुंतागुंतीमुळे मनाच्या कोशात अडकलेल्या विशेष, मतिमंद मुला-मुलींसाठी कार्यरत संस्था आहे. या मुलांचे शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी उचलण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. येथे ६ ते ४४ वयापर्यंतचे २२ मुलीं तर ३० मुलांसह एकूण ५२ मुले आहेत. घरच्यांनी नाकारलेली, अनाथ, पालकांनी कायमस्वरूपी संस्थेत सोडून दिलेली अशा मुलांना एकत्र करून त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे उपजिविकेचे साधन निर्माण करून स्वतःच्या पायावर उभे करणे हेच अनिकेत सेवाभावी संस्थे ध्येय आहे अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका सौ. कल्पना वर्पे यांनी दिली.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईला तोंड देणे हा संस्था चालकांनपुढे आव्हान आहेच सोबतच जागा भाड्याची असल्याने ते भाडे वेळेत देणे देखील कठिण होत आहे. या सर्व मुलांना आपल्या हक्काचे एक घर असाव असा प्रस्ताव संस्थेचा सर्व समाजातील घटकांना असल्यामुळे आपण आपल्या परीने जशी जमेल तशी मदत करावी अशी अपेक्षाही सर्व मुलांच्या वतीने त्यांनी व्यक्त केली.
अनिकेत सेवाभावी संस्थेच्या अधिक माहिती साठी www.aniket.org या वेबसाइटवर तथा भुगाव रोड, जुना जकात नाका, सुरभी हॉटेल जवळ, बावधन खुर्द, पुणे येथे संस्थेस भेट द्या किंवा 9921187127 अथवा 9085558972 या नंबर वर संपर्क करा.