Перейти к содержимому

त्वष्टा कासार महाकालिका मंदिर पुणे । Twashta kasar Mahakalika temple Pune

Tales of Saints

0:00 / 0:00

त्वष्टा कासार महाकालिका मंदिर पुणे । Twashta kasar Mahakalika temple Pune

2 229 просмотров · 1 г. назад
Tales of Saints
34 тыс. подписчиков
2 229 просмотров · 1 г. назад
त्वष्टा कासार समाज महाकालिका मंदिर कारागिरांनी स्थापन केलेले हे मंदिर १२६ वर्षे जुने असून या मंदिरातील देवी हे कालीमातेचे अनन्यसाधारण रूप आहे. त्वष्टा कासार समाजाच्या या महाकालिका मंदिराची स्थापना १८९३ साली झाली असून, पुणे महानगरपालिकेने या मंदिराला तृतीय श्रेणी वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. हे हिंदू मंदिर कारागिरांनी स्थापन केले आहे. हे मंदिर कसबा पेठेत असून १७ व्या शतकात मराठा नगर रचनेप्रमाणे वसवलेली ही पेठ पुण्यातील आद्य वसाहतींपैकी एक आहे. लोकसंख्या वाढ आणि पायाभूत सुविधांचा विकास जसजसा होत गेला तसतसे वाडीचे रुपांतर कसब्यात झाले आणि कालांतराने कसब्याचे रुपांतर शहरात झाले. त्यामुळे कसबा पेठ वसायच्या आधी या भागाला पुनवडी असे नाव होते (वाडी म्हणजे घरांचा समूह). कसब्याची सामाजिक रचना ही बलुतेदारी पद्धतीवर (व्यवसायाधारित समाज) आधारित होती. तांबट किंवा कासार हे बलुतेदारांपैकी एक आहेत. त्वष्टा कासार हा तांब्यापासून वस्तू बनविणार्‍या कारागिरांचा (ताम्रकार) हिंदू समाज आहे. या समाजाचे वास्तव्य प्रामुख्याने महाराष्ट्रात आहे. तांबट हा शब्द तांबे या धातूसूचक शब्दावरून आला आहे. विश्वाची रचना करणार्‍या विश्वकर्म्याचा तिसरा मुलगा त्वष्टा, याचे आम्ही वंशज आहोत, असा या समाजाचा दावा आहे. ज्या ज्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे, तिथे तिथे या समाजाने ‘त्वष्टा कासार समाज कालिका मंदिराची’ स्थापना केली आहे. ही संस्था हे एक प्रकारचे समाज केंद्र असून तिथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विटा, मातीचा वापर करून बांधकाम केलेल्या एका वाड्यात हे मंदिर आहे. या वाड्याच्या जीर्णोद्धाराचे काम १९०६ साली करण्यात आले होते. कालिका ही इथली मुख्य अधिष्ठात्री देवता आहे. काली ही वैश्विक उर्जेशी संबंधित देवता असून भद्रकाली, महाविद्या काली, कात्यायनी आणि कामाख्या इत्यादी रुपांत ती पूजली जाते. कालिका पुराण हे हिंदू धर्मातील शाक्त संप्रदायाच्या १८ उपपुराणांपैकी एक आहे. हे पुराण कालीपुराण, सतीपुराण तसेच कालिकातंत्र इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. मंदिरातील मूर्ती ही पाषाणात कोरलेली असून साधारणपणे तीन फूट उंचीची आहे. गाभार्‍यात देवीच्या पाठीमागे नाजूक कलाकुसर असलेली २० किलो वजनाची चांदीची प्रभावळ आहे. मूर्तीचे जतन करण्याच्या उद्देशाने गेल्या कित्येक वर्षांपासून ती अनेकदा रंगविण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तीवर रंगांचे अनेक थर आहेत. कालिका देवी मंदिराच्या समोरच या समाजाचे ग्रंथालय आणि गणपतीसाठीचा मंडप बांधला आहे. ही संस्था १९८३ सालापासून गणेशोत्सव साजरा करते.