Перейти к содержимому

Roshniche Kayde Palayche | रोशनीचे कायदे पाळायचे... | Marathi Ghazal | Bhimrao Panchale

Gazal Nawaz Bhimrao Panchale

0:00 / 0:00

Roshniche Kayde Palayche | रोशनीचे कायदे पाळायचे... | Marathi Ghazal | Bhimrao Panchale

15 207 просмотров · 6 л. назад
Gazal Nawaz Bhimrao Panchale
17,1 тыс. подписчиков
15 207 просмотров · 6 л. назад
" खावर " : आठवण एका सूर्याची... प्रिय मित्रांनो...स्नेह ! बदीउज्जमा म्हणजे अद्वितीय आणि खावर म्हणजे सूर्य... ' काफला ' शिर्षकाचा अनमोल असा प्रातिनिधिक गज़ल संग्रह वाचताना या 'खावर' नावाशी थबकलो. त्यांच्या अप्रतिम गज़ल वाचून , हा सूर्य आत्तापर्यंत आपल्याला का दिसला नाही याचा अफसोस झाला. हजार दुःखे मनास माझ्या हजार जखमा उरात माझ्या वसंत असता सभोवताली ऋतू निराळाच आत माझ्या... काफला मधली मोठ्या बहरची ही खावरांची गज़ल मनात जी उतरली ती स्वरबध्द होऊनच बाहेर आली.. दापोलीच्या नॅशनल हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम केलेले खावर उर्दू आणि मराठी या दोन्हीही भाषेत लिहायचे.उर्दूत तर त्यांची जवळ जवळ वीस पुस्तकं आहेत. पुरस्कारही खूप मिळाले त्यांना. अप्रतिम गज़ल लिहूनही मराठीत मात्र तसे ते दुर्लक्षितच राहिले. त्यांच्या गज़लांच्या दोन-तीन छोट्या पुस्तिका कशाबशा उपलब्ध होत्या . गज़ल सागर प्रतिष्ठान तर्फे दापोली येथेच "जश्ने-खावर" आयोजित करून गज़ल कार्यशाळा , मुशायरा , ' समग्र खावर ' या संग्रहाचे प्रकाशन आणि मैफिल असा भरगच्च कार्यक्रम घडवून आणायचा हे पक्के ठरवले .डॉ.राम पंडित , वकार काद्री , मो. हुसेन परकार , सलाम बिन रज्जाक , खावरांचा मुलगा आतिश हे सगळे होतेच सोबतीला. खावरांचे अप्रतिम पेन्सिल स्केच व शीर्षक माझे मित्र निलेश प्रजापती व रमेश थोरात यांनी करून दिले. रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत - मोठ्या दिमाखात स्मृतिसोहळा संपन्न झाला . इम्तियाज खावर मॅडम यांचे हस्ते प्रकाशन केले. खावरांच्या आठवणी जागवल्या . खूप हळव्या झाल्या होत्या त्या . त्यांच्या घरी गेलो , खावरांच्या कबरीवर जाऊन सलाम पेश केला, कर्दा समुद्र किनाऱ्यावर आम्ही मनमुराद भटकलो. सगळेच कसे मस्तं, यादगार...! परवा रविवारी २७ सप्टेंबरला खावर साहेबांचा तिसावा स्मृतिदिन आहे . मित्रांनो ,त्या निमित्ताने खावरांची याद ताजी करण्यासाठी मी त्यांची एक बेहतरीन गज़ल तुमच्यासाठी पेश करतो..आणि तुम्हा सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो... खूप झाली पुस्तके खावर आता माणसांचे चेहरे चाळायचे... रोशनीचे कायदे पाळायचे... आपला स्नेहांकित, ग़ज़ल नवाज़ भीमराव पांचाळे Gazal Nawaz #BhimraoPanchale For More Updates Follow Me At - ______________________________________________________________ ★ Facebook https://bit.ly/BhimraoPanchaleFB ★ Twitter https://bit.ly/BhimraoPanchaleTweet ★ Instagram https://bit.ly/BhimraoPanchaleInsta ______________________________________________________________ Subscribe To My YouTube Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬ Useful Words - marathi ghazals , marathi ghazal kavita , marathi gazal Bhimrao Panchale , marathi gazal song , marathi ghazal mushaira, marathi gazal mushaira, marathi ghazal songs , marathi gazal , marathi wali ghazal , marathi sad ghazal , marathi romantic ghazal , best marathi gazal , marathi gane ghazal , bhimrao panchale ghazal marathi gazal , marathi gana ghazal , marathi gam bhari ghazal , marathi hit ghazal , marathi love ghazal , marathi gazal of bhimrao panchale , marathi prem gazal , marathi old ghazal , marathi gazal video , marathi gazal video song , marathi video ghazal , Gazal Nawaz Bhimrao Panchale , Bhimrao Panchale Gazals