Aaditya Thackeray | Satish Salian यांच्याकडून 500 कोटींची नोटीस, 8 मागण्या कुठल्या? | Disha Salian
Mumbai Tak
0:00 / 0:00
Aaditya Thackeray | Satish Salian यांच्याकडून 500 कोटींची नोटीस, 8 मागण्या कुठल्या? | Disha Salian
27 398 просмотров · 11 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
27 398 просмотров · 11 часов назад
Aaditya Thackeray | Satish Salian यांच्याकडून 500 कोटींची नोटीस, 8 मागण्या कुठल्या? | Disha Salian Case
दिशा सालियन प्रकरण (Disha Salian Case) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तब्बल 500 कोटी रुपयांची मानहानी नोटीस (Defamation Notice) पाठवली आहे. या नोटिशीत दोघांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत नुकसानभरपाई आणि सार्वजनिक माफीची मागणी करण्यात आली आहे.
नोटीसमध्ये सात दिवसांची मुदत (7-Day Deadline) देण्यात आली आहे. बिनशर्त, स्पष्ट आणि सार्वजनिक माफी मागण्यासोबतच ही माफी प्रमुख प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवर प्रसिद्ध करण्याची मागणी आहे. दोन्ही नेत्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर किमान तीन मिनिटांचा माफीनामा प्रसिद्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सतीश सालियन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी मागण्याच्या प्रयत्नांना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं चित्र उभं करण्यात आलं. तसेच CBI (Central Bureau of Investigation) ने आधीच तपास करून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिल्याचा दावा केल्याचा आरोपही नोटिशीत करण्यात आला आहे.
मग या 500 कोटींच्या नोटिशीत नेमक्या 8 मागण्या (8 Demands) काय आहेत? आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याकडून काय अपेक्षा करण्यात आल्या आहेत? जाणून घ्या सविस्तर.
#AadityaThackeray #SatishSalian #DishaSalian #DishaSalianCase #500CroreNotice #DefamationNotice #AnilDeshmukh #CBI #CBIFIR #MaharashtraPolitics #MumbaiNews #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.