सुरमई फ्राय | कोकण सफरीचा शेवट | Surmai Fish Fry | बाजारातून थेट थेट ताटात
रस्ता आणि रस्सा
0:00 / 0:00
सुरमई फ्राय | कोकण सफरीचा शेवट | Surmai Fish Fry | बाजारातून थेट थेट ताटात
968 просмотров · 1 дн. назад
रस्ता आणि रस्सा
3,59 тыс. подписчиков
968 просмотров · 1 дн. назад
कोकण सफरीचा शेवट करायचा, तर तो एका मस्त मासळीच्या बेतानेच! ❤️🐟
मागच्या भागात दापोलीच्या मासळी बाजारात अनुभवलेली लगबग आणि तिथून आणलेली सुरमई… आता वेळ आहे तिचं रूपांतर एका खमंग, कुरकुरीत बेतात करण्याची!
सुरमईला हळद, आलं-लसूण पेस्ट आणि मिठाचा साधा मसाला लावून मुरवायचं. त्यानंतर रवा, लाल तिखट आणि चिमूटभर मिठाच्या मिश्रणात छान घोळवायचं. मग मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजेपर्यंत तळायचं… आणि तयार होणार आपली *खमंग, रव्याच्या कुरकुरीत आवरणातली सुरमई फ्राय!* 😋
कोकणातले रस्ते, समुद्रकिनारे, माणसं, अनुभव आणि स्थानिक चवी यांच्यासोबत केलेल्या या प्रवासाचा शेवट यापेक्षा चांगला काय असू शकतो?
ही आहे *रस्ता आणि रस्सा – कोकण टूरची शेवटची मेजवानी!*
तुम्ही सुरमई फ्राय करताना रवा वापरता की तांदळाचं पीठ? की तुमच्याकडे आहे एखादी खास घरगुती पद्धत? कमेंटमध्ये नक्की सांगा!
व्हिडिओ आवडला तर Like करा, चॅनल Subscribe करा आणि आपल्या कोकणप्रेमी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
*रस्ता आणि रस्सा — महाराष्ट्राच्या रस्त्यांवर फिरायचं, स्थानिक चवींचा शोध घ्यायचा आणि मनसोक्त खायचं! ❤️*
#surmaifry #konkantour #dapoli #marathifoodvlog #konkanifood