Перейти к содержимому

Maharashtra: प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेला तो सार्वजनिक नवरात्र उत्सव | #navratri

Prime Samwad

0:00 / 0:00

Maharashtra: प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेला तो सार्वजनिक नवरात्र उत्सव | #navratri

700 просмотров · 2 года назад
Prime Samwad
62,6 тыс. подписчиков
700 просмотров · 2 года назад
#primesamwad #navratrispecial #mumbai #rajthackeray #uddhavthackeray मान मराठी - अभिमान मराठी. प्राईम संवाद चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. ! --------------------------------------------------------------------------------- प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे ' संयुक्त महाराष्ट्र 'लढ्यातील एक अग्रणी नेतृत्व! लेखन,पत्रकारिता,संपादन,प्रकाशन, चित्रकारिता,नाट्य, सिनेमा, छायाचित्रण,समाज व धर्मसुधारणा,  इतिहास संशोधन अश्या    विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे  त्याचबरोबर आपल्या जळजळीत व सडेतोड वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व.प्रबोधनकार प्रखर हिंदूधर्माभिमानी तर होतेच परंतु धर्मातील अयोग्य रुढी, परंपरा, प्रथा,जातीभेद यावर त्यांनी कायमच ठाकरी आसूड चालवला.याच प्रबोधनकार ठाकरेंच्या संकल्पनेतून सुरूवात झाली ती महाराष्ट्रातल्या पहिल्यावहिल्या सार्वजनिक नवरात्र उत्सवाला.या उत्सवाबाबत माहिती घेण्याआधी आपण जाणून घेऊ याची पार्श्वभूमी.काळ होता स्वातंत्र्यापूर्वीचा साल १९२६. लोकमान्य टिळकांनी व्यापक सार्वजनिक स्वरूप दिलेला गणेशोत्सव एव्हाना महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होत होता. हिंदू समाजातील स्पृश्य -अस्पृश्य सर्व लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा व्हावा व त्यानिमित्ताने ब्रिटीश सरकार विरोधात लोकांची एकजूट व्हावी असा लोकमान्यांचा यामागे मुख्य हेतू होता. दादरमध्ये ही असाच सार्वजनिक गणेशोत्सव अनेक वर्ष सुरू होता.मात्र हा उत्सव कालांतराने भरकटत गेला. या गणेशोत्सवात कर्मठ ब्राम्हण मंडळींचे वर्चस्व इतके वाढले की उत्सवाच्या कार्यकारी मंडळात ब्राम्हणेतरांना स्थानच नसे.उत्सवात संस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्यांबाबतीतही तोच प्रकार,  त्यातही ब्राम्हणेतरांना सहभागी करून घेतले जात नसे.उत्सवाची देणगी मात्र सर्वच जाती जमातींकडून स्वीकारली जात असे.याच काळात हिंदू जनांची एकजूट व्हावी. स्पृश्य-अस्पृश्य भेद नाहीसे व्हावेत म्हणून तरुणांची मंडळे स्थापन होऊन चळवळी सुरू होत्या. दादरच्या गणेशोत्सवातल्या या घडामोडींवरही  या चळवळीतील तरुणांचे लक्ष होतेच. #prabhodhankar #matoshri #shivtirth #amitthackeray #adityathackeray --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आमच्या चॅनलला subscribe करायला विसरू नका. Bell Icon दाबून ठेवा म्हणजे नवीन विडियो चे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. :    / @primesamwad   नक्की फॉलो करा :- Instagram: https://www.instagram.com/prime_samwa... Facebook: https://www.facebook.com/profile.php?...