Перейти к содержимому

संपूर्ण स्वरचित मंगलाष्टके | SAMPURN SWARACHIT MANGALSHTAKE 2026 | VIKAS LAMBORE विकास लांबोरे

VIP SHREE Productions и Red & Circle Creations

0:00 / 0:00

संपूर्ण स्वरचित मंगलाष्टके | SAMPURN SWARACHIT MANGALSHTAKE 2026 | VIKAS LAMBORE विकास लांबोरे

120 690 просмотров · 6 месяцев назад
VIP SHREE Productions и Red & Circle Creations
120 690 просмотров · 6 месяцев назад
Red & Circle Creations Presents VIP SHREE Productions नवीन स्वरचित मंगलाष्टके New Swarachit Mangalashtake रचना / सदरकर्ते शाहीर विकास लांबोरे निर्माता तुषार पालकर मार्गदर्शक नितीन पवार सर एडिटर : निलेश किंजलकर सर पोस्टर - अक्षय नेवरेकर 1) आला क्षण, सुवर्णयोग तुझिया | भाळीचिया प्राक्तना || ठेवावा जपुनिया अंतरी | हा सोहळा देखणा || सोन्याचा दिन आज हा उगवला | सुखावतो लोचना || लाभो सौख्य तुम्हांस हे उभयता | कुर्यात सदा मंगलम शुभ लग्न सावधान || 2) हर्षाच्या क्षणी आज हे साक्षीला | आप्त गण सोबती || वरिते वर श्रीराम जानकी वधू | लग्नविधी मंडपी || हाती ठेवुनी अक्षता सज्जन | माथ्यावरी टाकती | घ्यावा हा शुभ आशिष वधूवरा | कुर्यात सदा मंगलम शुभलग्न सावधान || 3) सह्याद्री करितो जयांस मुजरा, शिवराय छत्रपती... राजा जाणता तेज तो भास्कर, श्रीमान श्री गडपती.. त्यांच्यावानी नसे असा प्रजापती, सारथी शिवा नृपती.. घेवोनि बरवा विचार त्यांचा तो, व्हावे तुम्ही सोबती... 4) मायेने तुज वाढवितो पिता, सांभाळीले आईने.. शौर्याच्या गुजगोष्टी सांगुनिया, निजविले ओवीने.. नात्याची वीण ही अशीच जपुनी, जाणीव ती ठेवणे.. संसाराचे फुल उमलो देखणे, हेचि तुम्हा सांगणे 5) जन्मोजन्मी मिळतसे, सोबती ठेवुनी जाण भली... सजली ही नववधू मंडपी, वरास ह्या शोभली.. संसाराची मुहूर्तमेढ पुजुनी, स्वप्ने मनी पाहिली.. व्हावी ती परिपूर्ण ह्या जीवनी, कुर्यात सदा मंगलम शुभ लग्न सावधान 6) दुर्गेश्वर गड कोट रायगड असा, सिंहगड, तोरणा... प्रतापाची खूण सांगतो राजगड, विशाळगड रांगणा.. सुवर्ण विजयदुर्ग अन जंजिरा शिवनेरी तो देखणा.. 7) रचिला पाया शिरोमणी ज्ञानिया, निवृत्ति नाथ गुरु.. एकनाथ नामदेव, संत सावता गोरोबा, तुकोबा कल्पतरू.. कान्होपात्रा सखू जनाबाई अन, मुक्ताई ती आधारू.. संत सज्जन वंदिती विठ्ठल, रूखमाईचा तो वरु... 8) उभी ही, मुहूर्तमेढ मंडपी, देवाक हे पुजुनी.. आणा त्या उभयता सामोरी, वधू वरा सजवूनी.. वाद्ये करती निनाद मंगल, वाजंत्री हे वाजवूनी.. अंतरपाट धरा मधोमध असा, शुभाषिश वर्षुनी... 9) मल्लिकार्जुन वैजनाथ विश्वेश्वर, सोमनाथ घृष्णेश्वर.. महाकालेश्वर त्रंबकेश्वर शिव, केदार भीमाशंकर.. आता नागेश्वर रामेश्वर देखोनि, एकादश ओंकार.. ज्योतिर्लिंगे मिळोनि बारा स्मरा, शंभू श्री गौरीहर.. 10) दारी सोहळा सजला साजिरा आरास ही शोभली.. पुण्याईचा मिळे दाखला आज हा, नाती इथे लाभली.. उपरणे पदरास बांधुनिया, सप्तपदी ही भली.. सांभाळा कुळगोत्र, मित्र आप्तही नाती बरी आपुली