Перейти к содержимому

श्री गजानन महाराजांचे अष्टक🙏| संपूर्ण अष्टक |🌺Gajanan Maharaj Ashtak #gajananmaharaj #ashtak

SPRandhave Creations

0:00 / 0:00

श्री गजानन महाराजांचे अष्टक🙏| संपूर्ण अष्टक |🌺Gajanan Maharaj Ashtak #gajananmaharaj #ashtak

566 просмотров · 2 месяца назад
SPRandhave Creations
2,33 тыс. подписчиков
566 просмотров · 2 месяца назад
❤ प्रिय भक्तांनो 🙏 श्री गजानन महाराजांचे पवित्र 'अष्टक' भक्तिभावाने सादर केले आहे. श्रद्धेने आणि मनःपूर्वक हे संपूर्ण अष्टक ऐका. श्री गजानन महाराजांची कृपा आपल्या जीवनात सुख, शांती आणि मंगल घडवो. 🌺 🙏संपूर्ण अष्टक🙏🌺 गजानना गुणागरा परम मंगळा पावना | अशीव अवघें हरी दुरीत तेंवि दुर्वासना | नसे त्रिभुवनामधे तुजविणे आम्हा आसरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा || निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी | तुझी पतीतपावना भटकलों वृथा भूवरी | विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वासरा| करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा || अलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन | समर्थ गुरुराज ज्या भुषवी नाम नारायण | म्हणून तुज प्रार्थना सतत जोडूनिया करा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा || क्षणांत जल आणिलें नसून थेंब त्या वाहिला | क्षणांत गमनाप्रति करिसी इच्छिलेल्या स्थला | क्षणांत स्वरूपे किती विविध धारिसी धीवरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा || अगाध करणी तुझी गुरुवरा ! न लोकां कळे | तुला त्यजुन व्यर्थ ते अचरितात नाना खुळे | कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तीरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा || समर्थस्वरूपाप्रति धरुनी साच बाळापुरी | तुम्ही प्रकट जाहलां सुशिल बाळकृष्ण घरीं | हरीस्वरूप घेऊनी दिधली भेट भीमातिरी | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा || सच्छिद्र नौकेप्रती त्वदिंय पाय हे लागतां | जलात बुडता तरी तिजसि नर्मदा दे हाता | अशा तुजसि वाणण्या समर्थ माझी गिरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा || अतां न बहू बोलतां तव पदांबुजा वंदितों | पडो विसर न कदा मदिय हेंच मी मागतो | तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा | करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा || 🌺 गण गण गणात बोते 🌺 🙏 श्री गजानन महाराज की जय 🙏 जर हा व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, ❤️ Share करा आणि भक्तीमय व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा. श्री गजानन महाराज अष्टक, श्रींचे अष्टक, गजानन महाराज अष्टक, Gajanan Maharaj Ashtak, Gajanan Maharaj Song, Gan Gan Ganat Bote, Shegaon Gajanan Maharaj, Marathi Bhakti Geet, Marathi Devotional Songs, Gajanan Vijay, Gajanan Maharaj Bhajan, Shegaon Live Darshan, Bhakti Song Marathi #GajananMaharaj #ShrincheAshtak #GajananMaharajAshtak #GanGanGanatBote #Shegaon #MarathiBhakti #BhaktiGeet #Devotional #MarathiSong #Bhakti #SarvaDevam #Spiritual #GajananVijay #GajananMouli 🙏 गण गण गणात बोते! श्री गजानन महाराजांवर तुमची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा – "गण गण गणात बोते 🙏" 🌺