Перейти к содержимому

शिक्षण सेवक - व्यथा नाही वास्तव! | Shikshan Sewak | Rahul Arun Ghaymukte Films

IA Films

0:00 / 0:00

शिक्षण सेवक - व्यथा नाही वास्तव! | Shikshan Sewak | Rahul Arun Ghaymukte Films

41 278 просмотров · 7 дней назад
IA Films
1,36 тыс. подписчиков
41 278 просмотров · 7 дней назад
🎬 शिक्षण सेवक | एक वास्तव शिक्षक म्हणजे फक्त वर्गात उभं राहून शिकवणारा माणूस नाही. तो मुलांचं भविष्य घडवतो… पण त्याचं स्वतःचंही एक घर असतं. आई-वडिलांची जबाबदारी, मुलांचं शिक्षण, घरखर्च, गावापासून दूरची नोकरी, मर्यादित मानधन, प्रशिक्षण, शालेय कामकाज, शालेय पोषण आहाराची जबाबदारी, निवडणूक ड्युटी, जनगणना, विविध प्रशासकीय कामं… आणि या सगळ्यांच्या मध्ये रोज वर्गात उभं राहून विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी. TET–TAIT सारख्या परीक्षा देऊन, अनेक वर्षे भरतीची वाट पाहून नोकरी मिळवणाऱ्या शिक्षकाच्या आयुष्यात नोकरी मिळाल्यानंतरचं वास्तव नेमकं कसं असतं? “शिक्षण सेवक” ही कोणत्याही एका व्यक्तीची कथा नाही. ही ग्रामीण भागात काम करणाऱ्या त्या शिक्षकाच्या वास्तवाकडे पाहण्याचा एक प्रयत्न आहे, जो दिवसभर इतरांच्या मुलांच्या भविष्याची काळजी घेतो… आणि संध्याकाळी आपल्या घराच्या जबाबदाऱ्यांचा विचार करतो. मुद्दा केवळ पगाराचा नाही. मुद्दा आहे — कामाची व्याप्ती, जबाबदारी, वेळ, श्रम आणि त्याला मिळणारा योग्य मान. कारण… “मी मुलांचं भविष्य घडवतोय, पण माझ्या घराचं वर्तमानही मला जगायचं आहे.” ही फिल्म तुम्हाला भावली असेल, तर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या किंवा शिक्षकांच्या वास्तवाशी जोडलेल्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. शिक्षण सेवक व्यथा नाही… वास्तव. 🎬 Created & Written by — राहुल अरुण घायमुक्ते #शिक्षणसेवक #शिक्षक #TeacherLife #TeacherReality #MaharashtraTeachers #Education #GovernmentTeacher #TeachingLife #RuralEducation #TeacherLifeIndia #मराठीशॉर्टफिल्म #शिक्षकांचेवास्तव #राहुलअरुणघायमुक्ते