नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडले ठळक मुद्दे | आमदार शरददादा सोनवणे | हिवाळी अधिवेशन | 17.12.2024
Sharad Sonawane - शरद सोनवणे
0:00 / 0:00
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडले ठळक मुद्दे | आमदार शरददादा सोनवणे | हिवाळी अधिवेशन | 17.12.2024
2 738 просмотров · 1 год назад
Sharad Sonawane - शरद सोनवणे
4,99 тыс. подписчиков
2 738 просмотров · 1 год назад
नागपूर येथील सुरू असलेल्या डिसेंबर २०२४ हिवाळी अधिवेशनात काही ठळक मुद्दे मांडण्याची संधी मिळाली, यानिमित्ताने मी राज्यपाल यांच्या अभिभाषणचे व मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री व नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन करत खालील ठळक मागण्या केल्या.
●धरण पाणीसाठा वाढ होण्यासाठी धरणातील गाळ त्वरित काढण्यासाठी पाऊले उचलावी
●मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पण तरी देखील अनेक वर्षे प्रलंबित असलेला बेळगाव सीमा प्रश्न मार्गी लागला नाही, राज्य शासनाच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागावा
●जुन्नर तालुका प्रथम व एकमेव पर्यटन तालुका आहे त्यासाठी ५००० कोटी DPR लवकरच तयार करणार आहे, या माध्यमातून दरवर्षी शिवजन्मभूमीला रु ५०० कोटी पर्यटन विकासाठी मिळावे
●वयोवृद्धांना शिवरायांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेता यावे म्हणून रोपवेची मागणी
◆राज्यातील अष्टविनायक मंदिरांसाठी रु ५० कोटींचा विकास निधी देण्यात यावा
●शेतकरी हितासाठी स्वतंत्र कृषी बजेट आखावा
●ग्रामीण भागासाठी रु. १० कोटी आमदार फंडची तरतूद करण्यात यावी
●दार्या घाट डीपीआर त्वरित मंजूर करण्यात यावा जेणेकरून जुन्नर मुंबईच्या जवळ येऊन दळणवळण वाढेल
●बिबट सफारी मंजूर आहे, जलद गतीने काम व्हावे
●अंगणवाडी आशासेविका यांना न्याय मिळावा, त्यांची योग्य पगारवाढ व्हावी
●जुन्नर तालुक्यात ५ धरण असून सुद्धा आणे पठार भाग अनेक वर्ष पाण्यापासून वंचित आहे, या भागाला न्याय मिळावा
●कोपरे मांढवे भागाला एममाय टॅंकची तरतूद व्हावी
●बुडीत बंधारे काम जलद गतीने व्हावे
●आदिवासी बांधवांसाठी हिरडा कारखाना मंजूर आहे, त्वरित निधीची तरतूद करून कारखाना चालू व्हावा
●रांजणगाव, चाकण, तळेगाव आयटी पार्क मध्ये स्थानिक लोकांना रोजगारासाठी प्राधान्य मिळावे
●जुन्नर तालुक्यात इतर कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाही, आयटी पार्क उभारणी करावी जेणेकरून रोजगार निर्मिती होईल.