Перейти к содержимому

Nankhatai Recipe | Diwali Special Recipe | दिवाळीसाठी खास नानकटाई बिस्किट्स रेसिपीज | नानखटाई

Gharcha Swaad

0:00 / 0:00

Nankhatai Recipe | Diwali Special Recipe | दिवाळीसाठी खास नानकटाई बिस्किट्स रेसिपीज | नानखटाई

186 055 просмотров · 8 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
186 055 просмотров · 8 лет назад
#bakerystylenankhatai #nankhatairecipeinmarathi #diwalifaralrecipe साहित्य - ५०० ग्रॅम मैदा, ५०० ग्रॅम वनस्पती तूप ( डालडा ), १½ कप सुक्या खोबऱ्याचा खीस, १½ कप बारीक रवा, किंचित खायचा सोडा, २०० ग्रॅम पीठी साखर, ½ tea spn हिरवी वेलची पावडर, ½ tea spn जायफळ पावडर, १ tea spn मीठ, ३ किंवा ४ tbl spn कोकोआ पावडर आणि सजविण्याकरिता काजू पिस्त्याचे काप. कृती - सर्व प्रथम तूप एका मोठ्या परातीत काढून चांगले फेसून घ्यावे. तूप फेसून झाल्यावर त्यात पिठीसाखर घालावी आणि ती सुद्धा चांगली फेसून घ्यावी. तूप आणि साखर चांगली फेसून झाल्यानंतर यात मीठ आणि खायचा किंचित सोडा घालावा आणि पुन्हा फेसून घ्यावं. आता यात थोडा थोडा मैदा घालावा, सोबत वेलची आणि जायफळ पावडर घालून घट्ट फेसून एक लगदा तयार करावा. या लगदयाचे दोन भाग करून एका भागात कोकोआ पावडर घालून चांगलं एकजीव करावं. आता एका हातात छोटा गोळा घेऊन बटर पेक्षा थोडा कमी आकाराचा गोळा तयार करावा आणि सर्व नानखटाई तयार करून त्यांना वर काजू आणि पिस्त्याचे काप लावून सजवून घ्या. आता जर घरात ओव्हन असेल तर प्रीहीट करून १८० डी. से. वर १५ ते २० मिनिटे भाजून घ्यावी आणि बेकरीत भाजत असाल तर बेकरीचे तापमान जास्त असेल तर १५ मिनिटे आणि कमी असेल तर २०-२५ मिनिटे असं अंतर ठेवून छान भाजून घ्यावी. आपली खमंग आणि स्वादिष्ट नानखटाई तय्यार. ( २५० ग्रॅम नानखटाईचे प्रमाण - १५० ग्रॅम मैदा, १५० ग्रॅम वनस्पती तूप ( डालडा ), ½ कप सुक्या खोबऱ्याचा खीस, ½ कप बारीक रवा, ¼ tea spn खायचा सोडा, १०० ग्रॅम पीठी साखर, ¼ tea spn हिरवी वेलची पावडर, ¼ tea spn जायफळ पावडर, ¼ tea spn मीठ, १½ tbl spn कोकोआ पावडर आणि सजविण्याकरिता काजू पिस्त्याचे काप. ) If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad   For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com