भीमपलास रागातील २ भावपूर्ण मराठी गाणी
Ketki Tendolkar
0:00 / 0:00
भीमपलास रागातील २ भावपूर्ण मराठी गाणी
23 370 просмотров · 4 года назад
Ketki Tendolkar
30,3 тыс. подписчиков
23 370 просмотров · 4 года назад
Tujhe geet ganyasathi | Tula pahate re tula pahate | Ketki Tendolkar | Anjali Maideo
गायक - केतकी तेंडोलकर आणि अंजली मायदेव
भीमपलास मराठी गीते | Bhimpalas Marathi Geete Lyrics
Song 1- Tujhe geet ganyasathi (तुझे गीत गाण्यासाठी)
तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउं दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुं दे रे
शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या-निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाउं दे रे |
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा-दिडदा वाजती सतारी, वाजती सतारी
सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहुं दे रे |
शांत-शांत उत्तररात्री मंद-मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे |
Song 2- Tula Pahate re
तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
जरी आंधळी मी तुला पाहते !
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनीं प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते !
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते !
कधी भक्त का पाहतो ईश्वराला ?
नदी न्याहळी का कधी सागराला ?
तिच्यासारखी मी सदा वाहते !
#Latamangeshkar #Bhimpalas #MarathiGeetmala
Disclaimer: This song is used for cover only. I don't own the rights to the original song. Copyrights to the photos/ pictures used in the video belong to the original photographers. (Music - gajarpungi)