Tuljapur+Humanabad Karnataka+Mardi+Bale👀❤️
City pride
0:00 / 0:00
Tuljapur+Humanabad Karnataka+Mardi+Bale👀❤️
110 просмотров · 2 года назад
City pride
43 подписчика
110 просмотров · 2 года назад
Volg1
तुळजापूर+हुमनाबाद कर्नाटक+मार्डी+बाळे
1 Tuljapur :-तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात. तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील १५५४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २९९ कुटुंबे व एकूण १३९२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर तुळजापूर ११ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७२५ पुरुष आणि ६६७ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २०० असून अनुसूचित जमातीचे ४४ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६१५३४ [१] आहे.
2 :- Shri Veerabhadreshwara Temple Karnataka
हुमनाबाद रेल्वे स्थानकापासून 2 किमी अंतरावर आणि बिदरपासून 51 किमी अंतरावर, श्री वीरभद्रेश्वर मंदिर हे हुमनाबाद येथे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
श्री वीरभद्रेश्वर मंदिर 1725 मध्ये राजा रामचंद्र जाधव यांनी बांधले होते. भगवान वीरभद्र, भगवान शिवाचे दुसरे रूप, हे मंदिर त्याच्या हलत्या खांबासाठी प्रसिद्ध आहे. गर्भगृहातील मूर्ती अतिशय भव्य आहे. मंदिरात सुमारे 50 फूट उंचीचे दोन उंच दीपस्तंभ आहेत.
पौराणिक कथेनुसार, यज्ञात आत्मदहन केलेल्या सती, शिवाच्या पत्नीनंतर, रुद्र (शिव) च्या क्रोधाने वीरभद्र हा एक सुपर आहे. वीरभद्र हे वीरशैव लिंगायत, मुख्यत: कर्नाटक आणि तामिळनाडू येथील पंचम-आचार्यांच्या प्राथमिक देवतांपैकी एक आहे.
जानेवारी/फेब्रुवारीमध्ये वार्षिक सात-दिवसीय वीरभद्रेश्वर जत्रा आयोजित केली जाते. यावेळी भगवान वीरभद्रेश्वराचे हे प्राचीन मंदिर लाखो पर्यटकांना आकर्षित करते.
वेळा: सकाळी 7 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 8.
3:-Mardi aai
सोलापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून ओळख असलेल्या यमाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावी यमाई देवीचे मंदिर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र महिन्यात यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेला शनिवारपासून सुरुवात झाली असून एकूण चार छबिना यावेळी निघतात. मार्डी येथे यमाई देवीचे पुरातन मंदिर आहे. रंगनाथ स्वामी गोसावी यांनी ८०० वर्षांपूर्वी मंदिरात यमाई देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. मार्डी येथील यमाई देवी तुळजापूरच्या तुळजाभवानी आईची मोठी बहीण म्हणून ओळखली जाते. साक्षात आदिशक्तीच्या वास्तव्यामुळे मार्डीला शक्तीपीठांचा वारसा लाभला आहे. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर यमाई देवीचे दर्शन घेण्याची परंपरा भाविक पाळतात. गुलबर्गा जिल्ह्यातील शेडम चीतापूर जवळील रंगनाथ स्वामी गोसावी हे देवीचे निस्सिम भक्त होवून गेले.श्री देवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार पद्मशाली समाजाचे कुलदैवत तथा महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणून मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो. तेच मारोडी म्हणजे सध्याचे मार्डी गाव आहे. भागवत ग्रंथांमध्येही मार्डीचा उल्लेख आढळतो. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो भाविक आई यमाई देवीच्या दर्शनासाठी मार्डी येथे येतात.
4 bale Solapur ;- बाळे गावचे पाटील माणकोजीराव यांनी खंडोबाची बालकाच्या रूपात आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केल्यामुळे त्या गावाला बाळे हे नामाभिधान प्राप्त झाले, अशी अख्यायिका आहे. माणकोजीरावांच्या घराण्यासह आता अनेकांचे कुलदैवत असलेल्या बाळेच्या खंडोबाची यात्रा आता सुरू होत असून,चंपाषष्टीपासून सुरु होणाºया मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी बाळे मंदिरात भक्तांचा महापूर असतो व संध्याकाळी ८ ते १० या वेळेत छबिना, पालखीसह गावातील मानकरी व भक्तगण यात सामील होतात़ अत्यंत सुंदर व आकर्षक दारूकाम व वाद्यांचा गजर यामुळे वातावरण भक्तिमय होते
माणकोजीराव पाटील यांच्या कुटुंबीयांचे श्री खंडोबा हे कुलदैवत आहे़ पाटील हे अणदूर येथील खंडोबास नित्यनियमाने पायी चालत जाऊन दर्शन व पूजाविधी करत असत़ त्यांची श्री खंडोबाचरणी निस्सीम अशी भक्ती होती़ काही कालावधीनंतर श्री खंडोबा हे पाटील यांच्या स्वप्नात आले अन् माझी आपल्या देवघरात स्थापना करून तेथेच पूजा, अभिषेक कर असे सांगितले़ त्यानुसार पाटील यांनी बाळाच्या रूपात आलेल्या खंडोबाची प्रतिष्ठापना केल्याची माहिती देण्यात आली.
सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर बाळे हे गाव आहे़ या गावात कुलदैवत श्री खंडोबाचे भव्य मंदिर आहे़ खंडोबा हे सोलापूरसह राज्यातील अनेक समाजबांधवांचे कुलदैवत आहे़ बाळे येथील खंडोबा मंदिरातील पुजारी व अणदूर येथील श्री खंडोबाचे पुजारी एकच असून, दोन्हीकडील मंदिरात नित्यनियमाने सारखीच पूजाअर्चा केली जाते़ या मंदिराची देखभाल करण्यासाठी स्थानिक ट्रस्टची नोंद केलेली आहे़ ते मंदिराचा सर्व कारभार पाहतात.
#vlogging #motovlogging #vlogginglife #vloggingcamera #vloggingyoutubers #travelvlogging #vloggingfamily #dailyvlogging #familyvlogging #vloggingcouple #motovloggingcommunity #vloggingmums #vloggingchannel #vloggingday #foodvlogging #vloggingsetup #vloggingmom #kidsvlogging #vloggingtips #ukvloggingmumsclub #vloggingcameravlogsquad #vloggingyoutuber #youtubevlogging #vloggingislife #instavlogging #motovloggingfamily #vloggingmama #vlogginglifestyle #vlogging101 #tuljapur #solapur