Baramati "सोमेश्वर" च्या अहवालात पार्थ पवार यांचा फोटो नाही ! काकडे अन् जगताप यांच्यात राजकारण तापलं
IMIRROR.DIGITAL
0:00 / 0:00
Baramati "सोमेश्वर" च्या अहवालात पार्थ पवार यांचा फोटो नाही ! काकडे अन् जगताप यांच्यात राजकारण तापलं
5 008 просмотров · 8 дней назад
IMIRROR.DIGITAL
22,2 тыс. подписчиков
5 008 просмотров · 8 дней назад
#news #punenews #punekar #baramati #baramatielection #election #parthpawar #sunetrapawar #sharadpawar #breaking #breakingnews #maharashtra
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या अहवालातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा फोटो वगळल्याचे समोर आले आहे. यावर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. “कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांना पार्थ पवारांचा फोटो अहवालात घेण्याची लाज वाटत असेल किंवा पार्थ पवारांना ते आपल्या लेव्हलचे समजत नसतील,” असा टोला सतीश काकडे यांनी लगावला आहे.
यावर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी उत्तर देत दिलगिरी व्यक्त केली आहे.सध्या कारखान्याची निवडणूक लागलेली आहे त्या व्यापात प्रशासन होतं आणि त्या गडबडीत अनावधानाने खासदार पार्थ पवार यांचा फोटो टाकायचा राहून गेला. मात्र या मुद्द्यावरून काही विक्षिप्त व्यक्ती स्वतःचा स्वार्थ साधू इच्छितात असं जगताप यांनी म्हटलं आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. याआधी काढलेल्या अहवालावरून वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेले पॅनल सध्या कारखान्यावरती संचालक म्हणून असून सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लागली असताना पार्थ पवारांचाच फोटो अहवालातून गायब करण्यात आलेला आहे.त्यामुळे शेतकरी कृती समितीचे सतीश काकडे यांनी कारखान्याच्या चेअरमन वरती टीकास्त्र डागले आहे.