एक हजार किलोमीटरचा प्रवास आणि दत्त गुरुंचे दर्शन I A Thousand Kilometres Journey I
Explore With Carlekar
0:00 / 0:00
एक हजार किलोमीटरचा प्रवास आणि दत्त गुरुंचे दर्शन I A Thousand Kilometres Journey I
27 433 просмотра · 2 месяца назад
Explore With Carlekar
24,8 тыс. подписчиков
27 433 просмотра · 2 месяца назад
नमस्कार मित्रांनो..
मी आणि अतुल दादा दत्त गुरूंच्या दर्शनासाठी निघालो आहोत आणि त्यासाठी आम्ही पुण्यातून सर्वप्रथम जाणार आहोत श्री क्षेत्र औदुंबर येथे..तिथे श्री महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे गेलो आणि तिथे दर्शन घेऊन आम्ही पूजे माणगाव येथे असलेल्या श्री टेंबे स्वामी महाराजांच्या दत्त मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेतले..त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही वेंगुर्ला येथे असलेल्या श्री आनंदराज स्वामी महाराजांच्या मंदिरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आत्मलिंग पादुकांचे दर्शन घेतले आणि पुण्याला परतलो ..
पण ह्या प्रवासाची सुरुवात झाली ती मी आणि अतुल दादा भेटल्यानंतर..
नुकतीच मी चार धाम यात्रा पूर्ण केली आणि तिथून आल्यावर आमचे मित्र श्री अतुल दादा हे अमेरिकेतून भारतात परतले होते आणि मग माझ्या चार धाम यात्रेच्या अनुभव सांगण्यासाठी आणि त्यांचे अमेरिकेतील अनुभव ऐकण्यासाठी आम्ही दोघे भेटलो..
ह्या दरम्यान अतुल दादानी श्री क्षेत्र माणगाव येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही दोघांनी लगेचच ह्या प्रवासाचे नियोजन करायला सुरुवात केली.
आणि त्यानुसार आम्ही दिनांक १५ जुलै रोजी सकाळी पाच ते सहा च्या दरम्यान पुण्यातून प्रवासाला निघायचे ठरविले..पहिल्या दिवशी आम्ही पुण्याहून सर्वप्रथम नरसोबाची वाडी येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दर्शना जायचे आणि मग तिथून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या माणगाव येथे जायचे ठरविले..
ठरल्याप्रमाणे १५ जुलै रोजी सकाळी पावणेसहा वाजता अतुल दादा मला घ्याला आले आणि मग माझ्या घरापासून आम्ही प्रवासाला सुरवात केली.
मित्रानो आज आम्ही चर्चा करत होतो की सध्या खंबाटकी घाटामधून हलक्या वाहनानं जाण्यासाठी नवीन बोगद्यातून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आम्हाला हा नवीन मार्गावरून प्रवास करायला मिळेल..
पण प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही कारण आम्हाला जुन्याच खंबाटकी घाटामधून जावे लागले आणि नवी मार्ग अजून सुरू झालेला नाही असे सांगण्यात आले..
खंबाटकी घाट उतरून आम्ही वेळे गाव ओलांडून पुढे साताऱ्याच्या दिशेने जाईल निघालो, वाटेत पाचवड ओलांडून आणेवाडी टोल नाका पार केला तो पर्यंत सकाळचे सात वाजत आले होते आणि म्हणून आम्ही साताऱ्यात असलेल्या हॉटेल मानस येथे नाश्ता करण्यासाठी थांबायचे ठरविले..
मित्रानो इथे मला आपले एक सबस्क्राईबर श्री पवार साहेब भेटले आणि त्यांच्या सोबत आम्ही नाश्ता केला आणि खूप गप्पा मारल्या आणि मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघलो
मित्रांनो हा संपूर्ण प्रवासाची सविस्तर माही आपल्याला आजच्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवट पर्यंत नक्की बघा
#दत्तगुरूंच्यादर्शनासाठीप्रवासकेला #explorewithcarlekar #श्रीदत्तगुरूदर्शन