Перейти к содержимому

हजेरी पटावर 191 शिक्षक, प्रत्यक्ष उपस्थित फक्त 56 ! 135 शिक्षक गेले कुठे? | कन्नड

विषय चर्चेचा Official, Vishay Charchecha official

0:00 / 0:00

हजेरी पटावर 191 शिक्षक, प्रत्यक्ष उपस्थित फक्त 56 ! 135 शिक्षक गेले कुठे? | कन्नड

164 просмотра · 10 дней назад
विषय चर्चेचा Official, Vishay Charchecha official
492 подписчика
164 просмотра · 10 дней назад
कन्नडमध्ये शिक्षक प्रशिक्षणाच्या उपस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे इयत्ता सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू आहे. मात्र प्रशिक्षणाच्या ठिकाणी दुपारच्या सत्रात पाहणी केली असता हजेरी पटावर १९१ शिक्षकांची नोंद असताना प्रत्यक्ष प्रशिक्षण कक्षात फक्त ५६ शिक्षक उपस्थित असल्याचे दिसून आले. यामध्ये जिल्हा परिषदेचे १२७ पैकी ४३ शिक्षक तर खासगी शाळांचे ६४ पैकी १३ शिक्षक उपस्थित असल्याचे दिसले. म्हणजे १३५ शिक्षक गैरहजर असल्याचे आकडेवारीवरून दिसते. यातील अनुपस्थिती पूर्वपरवानगीने होती का? ती अधिकृत होती का? याबाबत संबंधित विभागाकडून स्पष्टता होणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा संबंध इयत्ता सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाशी असल्याने शिक्षकांची उपस्थिती आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. पूर्ण बातमी पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 📍 कन्नड, छत्रपती संभाजीनगर 📅 ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ ⏰ सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.०० विषय चर्चेचा Official सत्याचा आवाज… स्फोटक चर्चा… निडर मांडणी! #कन्नड़ #शिक्षकप्रशिक्षण #शिक्षक #शिक्षण #छत्रपतीसंभाजीनगर #kannada #teachertraining #maharashtranews #educationnews #localnews #marathinews #vishaycharchecha