Перейти к содержимому

कोर्टरूम ते वकील परिषद: अ‍ॅड. गजानन चव्हाण यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Vidhi Foundation Thane

0:00 / 0:00

कोर्टरूम ते वकील परिषद: अ‍ॅड. गजानन चव्हाण यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

9 319 просмотров · 5 месяцев назад
Vidhi Foundation Thane
2,83 тыс. подписчиков
9 319 просмотров · 5 месяцев назад
🎬 पॉडकास्ट: उत्कृष्ट वक्ता व निष्णात फौजदारी वकील अ‍ॅड. गजानन चव्हाण यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उत्कृष्ट वक्ता, निष्णात फौजदारी वकील, कुशल संघटक आणि दूरदृष्टी असलेले प्रशासक – अशी केवळ ठाण्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे विद्यमान सदस्य, वरिष्ठ वकील मा. अ‍ॅड. गजानन चव्हाण साहेब यांच्यासोबत साधलेला हा विशेष संवाद! विधी फाउंडेशन ठाणे (Vidhi Foundation Thane) द्वारे आयोजित या पॉडकास्टमध्ये चव्हाण साहेबांनी त्यांच्या वकिली व्यवसायातील प्रवासावर दिलखुलास चर्चा केली आहे. नवोदित वकिलांपासून ते या क्षेत्रातील प्रत्येकासाठी ही मुलाखत अत्यंत मार्गदर्शक ठरेल. 📌 या पॉडकास्टमध्ये मुख्य काय पाहायला/ऐकायला मिळेल? वकिली व्यवसायाची सुरुवात: सुरुवातीचे दिवस आणि या क्षेत्रात स्थिर होण्यासाठी घेतलेली मेहनत. संघर्ष आणि यश: वकिलीतील संघर्षाचे क्षण आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शिस्त. प्रेरणादायी किस्से: त्यांच्या आयुष्यावर प्रभाव असलेल्या ज्येष्ठ वकिलांबद्दलचे खास अनुभव. महत्त्वाच्या केसेस: त्यांनी चालवलेल्या काही गाजलेल्या आणि महत्त्वाच्या केसेसचे अनुभव. वकिलांचे कल्याण: वकील वर्गासाठी आणि तरुण वकिलांच्या हक्कासाठी सुरू असलेले प्रयत्न. वकिलीची व्याख्या & नवोदित वकिलांना संदेश: नव्या पिढीतील वकिलांकडून असलेल्या अपेक्षा आणि यश मिळवण्याचा मंत्र. 🔔 विधी फाउंडेशन ठाणे चॅनेलला नक्की Subscribe करा, Like करा आणि हा व्हिडीओ तुमच्या वकील मित्रांसोबत नक्की Share करा!