Перейти к содержимому

4000 Years Old | कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर | Karneshwar temple Sangameshwar |

Trek-Diary Marathi Vlog

0:00 / 0:00

4000 Years Old | कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर | Karneshwar temple Sangameshwar |

1 110 просмотров · 4 г. назад
Trek-Diary Marathi Vlog
1,75 тыс. подписчиков
1 110 просмотров · 4 г. назад
रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असे म्हटले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण याने आपली राजधानी करवीर, कोल्हापूर इथून संगमेश्वर येथे स्थापन केली. त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे आणि महाल उभारले. बाराव्या शतकात लिंगायत समाजाचे बसव यांचे वास्तव्य संगमेश्वरमध्ये होते, तर सोळाव्या शतकात विजापुरी अंमल होता. सतराव्या शतकात शेख मुकर्रबखानाने छत्रपती संभाजीराजांना बेसावध स्थितीत संगमेश्वरातच कैद केले होते. या संगमेश्वरामध्ये कर्णेश्वर मंदिर आहे. हे मंदिर भूमीज नागर शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तारकापीठावर स्थित असून, त्याचे महाद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिम आणि उत्तर दिशांनासुद्धा प्रवेशद्वारे आहेत. मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत. भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची परिपूर्ण रचना आहे. मंदिरावर आतमध्ये आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार, कमल वेलींच्या मालिका, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत. या मंदिराच्या जवळपासच्या परिसरात अनेक पुरातन मंदिरांचा समूह आहे. ही सर्व देवालये आजही अपरिचित आणि दुर्लक्षित आहेत. कर्णेश्वर मंदिराच्या व्यतिरिक्त अलकनंदा नदीच्या उगमापाशी सप्तकोटीश्वर मंदिर आहे. इतर ठिकाणी सोमेश्वर, कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर), काळ भैरव, लक्ष्मी नृसिंह, दूधपिता गणपती अशी मंदिरेही आहेत. यापैकी एका मंदिराच्या मंडपाच्या बाहेरील पट्टीकेवर कामशिल्पे कोरलेली आहेत. या सर्व मंदिरांचा निर्मितीकाळ निश्चित झालेला नाही. पण ही मंदिरे इ. स. ५७५पासून पुढील काळात निर्माण झाली असावीत, असा कयास आहे. गुगल मॅप लिंक- https://www.google.co.in/maps/dir/Rat...