Перейти к содержимому

रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशीत इडली, सांबार व खमंग तिळाची चटणी | Idli Sambar | TIRTHA Kitchen

Tirtha Kitchen and Vlogs

0:00 / 0:00

रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशीत इडली, सांबार व खमंग तिळाची चटणी | Idli Sambar | TIRTHA Kitchen

1 203 просмотра · 3 мес. назад
Tirtha Kitchen and Vlogs
1,11 тыс. подписчиков
1 203 просмотра · 3 мес. назад
रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशीत इडली, सांबार व खमंग तिळाची चटणी | Idli Sambar | TIRTHA Kitchen #rationchyatandlachiidli #idlisambarrecipe #tilachichutney ​नमस्कार सुगरण मैत्रिणींनो, 'TIRTHA Kitchen & Vlogs' मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत! 😊 ​आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास दाक्षिणात्य बेत! आपण बनवणार आहोत अगदी बजेटमध्ये आणि सोप्या पद्धतीने रेशनच्या तांदळाची कापसासारखी मऊ, लुसलुशीत आणि गुबगुबीत इडली. सोबतच आपण बनवणार आहोत झटपट आणि चवदार सांबार आणि त्यासोबत खाण्यासाठी खमंग तिळाची चटणी. ​या व्हिडिओमध्ये मी डाळ-तांदूळ धुण्यापासून, ते मिक्सरमध्ये वाटताना पीठ गरम होऊ नये म्हणून वापरलेली 'थंड पाण्याची ट्रिक' आणि पीठ छान जाळीदार आंबवण्यासाठी १/४ वाटी साबुदाण्याचा खास वापर कसा करायचा, या सगळ्या टिप्स सुरुवातीपासून सविस्तर सांगितल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या इडल्या कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा! ​🌾 साहित्याचे अचूक प्रमाण (Ingredients List): ​१. मऊ इडलीसाठी: ​रेशनचा जाडा तांदूळ - ३ वाटी ​उडदाची सोला डाळ (उडदाची भगर/फतर) - १ वाटी ​साबुदाणा - १/४ वाटी (पाव वाटी) ​मेथी दाणे - १ छोटा चमचा ​थंड पाणी - वाटण्यासाठी ​मीठ - चवीनुसार ​जर तुम्हाला माझी ही पारंपरिक गावरान पद्धतीची रेसिपी आवडली, तर व्हिडिओला Like करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि आपल्या TIRTHA Kitchen & Vlogs चॅनेलला नक्की Subscribe करा! घंटीचे बटण (Bell Icon) दाबायला विसरू नका. ​धन्यवाद! 🙏✨ ​#IdliSambarRecipe #SoftIdli #TilaChiChutney #RationChyaTandlachiIdli #MarathiRecipe #SouthIndianBreakfast #CookingVlog #TIRTHAKitchenVlogs