व्याख्यान | आपली मुले घडवूया | पालक प्रबोधन | यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन | सौ. मंगल आहेर गावडे
यशोदीप शिष्यवृत्त्ती मार्गदर्शिका Yashodeep Scholarship
0:00 / 0:00
व्याख्यान | आपली मुले घडवूया | पालक प्रबोधन | यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन | सौ. मंगल आहेर गावडे
23 588 просмотров · 6 л. назад
यशोदीप शिष्यवृत्त्ती मार्गदर्शिका Yashodeep Scholarship
70,7 тыс. подписчиков
23 588 просмотров · 6 л. назад
प्रिय पालक सस्नेह नमस्कार
यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनेल सुरू होऊन आता दोन महिने पूर्ण होतील. या कालावधीत आपण मुलांसाठी अधिकाधिक व्हिडीओची निर्मिती केली. त्या सर्व व्हिडिओचा आपण भरपूर आनंद घेताय. त्यानिमित्ताने मुलांचा अभ्यासही पूर्ण होतोय. परंतु शाळा बंद असल्याने आता मुलांच्या अभ्यासाची खूपशी जबाबदारी पालक या नात्याने तुम्हा सर्वांवर येऊन पडलीय. या कालावधीत तुमची भूमिका कोणती असावी ? याबाबत तुम्हा सर्वांशी बोलावेसे वाटत होते. या व्याख्यानाच्या निमित्ताने ती संधी मी साधत आहे. माझ्या या व्याख्यानातून तुम्हा सर्वाना काही शिकविण्याचा माझा मुळीच हेतू नाही. तुम्हाला उपदेश करण्याइतकी मी मोठीही नाही. फक्त आपल्या सर्वांवर कोरोना च्या निमित्ताने ही आपत्ती आली आहे, तिचे इष्टापत्तीत रूपांतर करूया. आणि संकटातही संधी शोधण्याचा प्रयत्न करू या. शेवटी आपली मुले शिकती होणे हेच आपले सर्वांचे ध्येय आहे. आपल्याला हे व्याख्यान नक्की आवडेल. आणि त्यातून मुलांप्रती काहीतरी सकारात्मक घडो हीच सदिच्छा ! धन्यवाद !