Перейти к содержимому

रामरक्षा प्रवचन-8 | रामाचे पीतांबर म्हणजे काय? देव व माझ्यातील अंतर कसे दूर होते? | Aniruddha Bapu

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

0:00 / 0:00

रामरक्षा प्रवचन-8 | रामाचे पीतांबर म्हणजे काय? देव व माझ्यातील अंतर कसे दूर होते? | Aniruddha Bapu

30 665 просмотров · 1 год назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
348 тыс. подписчиков
30 665 просмотров · 1 год назад
आम्हाला पूज्य असलेले परमात्म्याचे अवतार श्रीराम व श्रीकृष्ण हे दोघेही ‘पीतांबर’ नेसलेले आम्ही पाहतो. गुरु दत्तात्रेयदेखील पीतांबरच धारण करतात. भगवान विठ्ठलाच्या आरतीतसुद्धा ‘पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला’ ही ओळ येते. तसेच माता शिवगंगागौरी (माता वल्गा - बगलामुखी) हीसुद्धा पिवळ्या रंगाची वस्त्रेच धारण करते व तिचे एक नावदेखील ‘पीतांबरा’च आहे. म्हणजेच ह्या परमात्म्याचा आणि पिवळ्या रंगाचा काहीतरी घनिष्ठ संबंध असला पाहिजे. तो काय आहे, ते सद्गुरु अनिरुद्ध बापू २३ डिसेंबर २००४ रोजी केलेल्या रामरक्षेवरील प्रवचनामध्ये, ‘पीतं वासो वसानं’ ही रामरक्षेतील पंक्ती समजावताना स्पष्ट करतात. तसेच, हा पीतांबर म्हणजे केवळ एक पिवळ्या रंगाचे वस्त्र नसून, ह्या पीतांबराचे भक्तविश्वाशी असलेले आध्यात्मिक नाते अतिशय सखोलपणे, पण सोप्या भाषेत बापू उलगडून दाखवतात व त्यासाठी ते, श्रेष्ठ संत जनाबाई यांचा - ‘नाचता नाचता हरीचा पीतांबर सुटला। सावर-सावर देवा ऐसे कबीर बोलला’ हा अभंग आणि जनाबाईंचीच एक कथा संदर्भासाठी घेतात. पीतांबरावरील ह्या विवेचनाच्या अनुषंगाने सद्गुरु बापू - ‘परमेश्वर व आपल्या मधील अंतर दूर कसे करायचे? भक्ती करताना काय लक्ष्य डोळ्यासमोर ठेवावे? आपल्या मनामध्ये रामाचा उदय होतो म्हणजे काय?’ अशा अनेक मुद्यांना स्पर्श करतात; तसेच ह्या पीतांबराचा ‘सगुण’ व ‘निर्गुणा’शी असणारा संबंध, श्रीरामांचे ध्यान करताना ह्या पीतवस्त्राचे महत्त्व, तसेच आमच्या लिंगदेहाशी असणारे ह्या पीतवर्णाचे नाते देखील स्पष्ट करतात. Previous Ramraksha Pravachan -    • रामरक्षा प्रवचन-7 |धृतशरधनुषं:‘रामबाण’ म्ह...   Next Ramraksha Pravachan -    • रामरक्षा प्रवचन-९ | आमच्या जीवनातील ‘ससा-क...   #AniruddhaBapu #ramrakshastotra #Shreeram #ayodhyamandir ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------