Перейти к содержимому

Ujjain| mahakal | उज्जैन। महाकाल। the city of god। मंदिरांचे शहर।संपूर्ण माहिती। the marathi vlogger

The Marathi Vlogger

0:00 / 0:00

Ujjain| mahakal | उज्जैन। महाकाल। the city of god। मंदिरांचे शहर।संपूर्ण माहिती। the marathi vlogger

5 455 просмотров · 4 г. назад
The Marathi Vlogger
28,4 тыс. подписчиков
5 455 просмотров · 4 г. назад
Ujjain| mahakal | उज्जैन। महाकाल। the city of god। मंदिरांचे शहर।संपूर्ण माहिती। the marathi vlogger #themarathivlogger जर तुम्ही उज्जैन मध्ये गेलात तर तुम्हाला तिथले स्थानिक ऑटो वाले ३००/- रुपया मध्ये ६ ते ७ मंदिरांचे दर्शन घडवतील.. त्यामध्ये, १) राम घाट २) भरतारी गुफा ३) मंगलनाथ मंदिर ४) गढ कालिका मंदिर ५) कालभैरव मंदिर ६) सिद्धवट घाट ७) सांदीपनी आश्रम एवढी ठिकाणे बघायला मिळतील.. उज्जैन(उज्जयिनी) भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे.हे उज्जैन जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात महाकवी कालिदास यांची ही नगरी आहे. या शहराला मंदिरांचे शहर म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच, मंगळ या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे. मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे. उज्जैनची लोकसंख्या सुमारे चार लाख आहे.वाके इतिहास महाभारत व पुराणात असा उल्लेख आहे की क्रूष्ण व बलराम उज्जैन येथे सांदिपनी आश्रमात विद्यार्जनासाठी आले होते. राजनीतिक इतिहास उज्जैन चा इतिहास खूप मोठा आहे. क्रूष्ण ची पत्नी मित्र वरून्दा उज्जैन ची राजकुमारी होती त्याचे दोन भाउ विंद आणि अनुविंद हे होते हे दोन्ही भाऊ महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने वीरगतीला गेले.के इसाच्या सहाव्या शतकात उज्जैन येथे एक प्रतापी राजा चंड प्रघोत होते.भारतातील अनेक राजा त्यांना घाबरून राहात. प्रघोत वंश नंतर उज्जैन मगध राज्याचा भाग बनला. महाकवी कालिदास उज्जैन च्या इतिहास प्रसिद्ध सम्राट विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. त्यांना उज्जैन खूप प्रिय होते. म्हणून कालिदास ने उज्जैन चे खूप छान वर्णन केले आहे.सम्राट विक्रमादित्यच महाकवी कालिदास चे वास्तविक आश्रयदाताच्या रूपाने प्रसिद्ध आहे. महाकवि कालिदास ची मालवाच्या प्रति खूप आस्था होती उज्जयिनी मध्येच त्यांनी अत्यधिक प्रवास-काळ व्यतीत केला आणि येथेच कालिदास ने उज्जैन च्या प्राचीन व गौरवशाली वैभव अनुभवले. वैभवशाली अट्टालिकाओं, उदयन, वासवदत्ता ची प्रणय गाथा, भगवान महाकाल संध्याकालीन आरती आणि नृत्य करीत असलेल्या गौरीगनाओंच्या बरोबर क्षिप्रा नदी चे पौराणिक महत्त्व इत्यादी ने परिचित होण्याची संधी पण प्राप्त केल्याचे समजते. मेघदूत मध्ये महाकवी कालीदासांनी उज्जैन चे सुंदर वर्णन केले आहे आणि ते सांगतात की जेव्हा स्वर्गीय जीवांना आपल्या पुण्यक्षीण होण्याच्या स्थिती मध्ये प्रूथ्वी वर यावे लागले होते तेव्हा त्यांनी विचार केला की आपन आपल्या बरोबर स्वर्गातील एक खंड (तुकडा) पण घेऊन जाऊ)या आणि तेच हे स्वर्ग खंड म्हणजे उज्जैन आहे. पुढे महाकवी कालिदास लिहितात की उज्जैन भारतातील ते प्रदेश आहे जेथे व्रूद्धजन इतिहास प्रसिद्ध अधिपती राजा उदजनच्या प्रणय गाथा सांगण्यात पूर्ण दक्ष आहे.