shree mahalxmi mata Dahanu |श्री महालक्ष्मी माता मंदिर डहाणू | Dahanu Mahalxmi Temple
Bhiwandikar Mayur
0:00 / 0:00
shree mahalxmi mata Dahanu |श्री महालक्ष्मी माता मंदिर डहाणू | Dahanu Mahalxmi Temple
2 821 просмотр · 4 года назад
Bhiwandikar Mayur
2,76 тыс. подписчиков
2 821 просмотр · 4 года назад
गडावरील श्री महालक्ष्मी (डहाणू) मातेचे मुख्य स्थान |MAHALAKSHMI GAD DAHANU |
• | गडावरील श्री महालक्ष्मी (डहाणू) मातेचे ...
डहाणू श्री महालक्ष्मी माता मंदिर
श्री महालक्ष्मी मातेचे हे स्थान महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील मुंबई अहमदाबाद हायवे लगत असलेल्या श्री क्षेत्र विवळवेढे येथे आहे. हे स्थान अतिशय जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे.
येथील श्री महालक्ष्मी मातेची अख्यायिका
एकदा एक आदिवासी गरोदर स्त्री वार्षिक यात्रेसाठी देवीच्या दर्शनाला गडावर जात होती. अचानक वाटेत तिच्या पोटात कळा येऊ लागल्या आणि तिला गडावर जाण्याचा पुढचा मार्ग चालणे कठीण झाले. देवीचे दर्शन होणार नाही म्हणून तिने देवीकडे दया याचना केली. त्यावेळी देवीने दृष्टांत देऊन सांगितले कि मी गडाच्या पायथ्याशी आहे तेथे तू दर्शनाला ये. त्या गरोदर मातेला गडाच्या पायथ्याजवळ येताच देवीच्या मूर्तीचे दर्शन झाले. त्यानंतर पुढे या जागी श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर बांधण्यात आले.
मंदिराचा इतिहासअसे सांगतात की एकेकाळी हे मंदिर अति श्रीमंत होत.1008 या सालामध्ये सुलतान मोहम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्यावेळी त्याने खूप सारा किमती ऐवजी लुटून नेला होता. असेही म्हणतात की गझनीच्या मोहम्मदाने हे मंदिर लुटून आणि उद्ध्वस्त केले होते.
त्यानंतर काही काळाने येथे पुन्हा मंदिर बांधले गेले. पूर्वी हे मंदिर लाकडी खांबांवर उभारलेले होते. काही काळाने याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आता हे दगडांच्या 58 खांबांवर हे मंदिर उभारण्यात आलय
येथे अश्विन नवरात्र व चैत्र नवरात्र साजरी केली जाते. वाघबारस आणि पितृ बारस हे सण साजरे केले जातात. त्याचबरोबर चैत्र महिन्यात देवीचा यात्रा उत्सव असतो. ही यात्रा चक्क पंधरा दिवसांची असते. या यात्रेकरिता महाराष्ट्र सह गुजरात व राजस्थान येथून लाखो संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येतात.
खरंच हे स्थान खूपच सुंदर आहे. तर एकदा नक्की आवर्जून या ठिकाणी भेट द्या.