तांदूळ आधी भाजून बघा… खिरीची चवच बदलेल! 😋 | पितृपक्षासाठी खास खीर
दिपाली स्वादिष्ट मेजवानी
0:00 / 0:00
तांदूळ आधी भाजून बघा… खिरीची चवच बदलेल! 😋 | पितृपक्षासाठी खास खीर
543 просмотра · 4 нед. назад
दिपाली स्वादिष्ट मेजवानी
131 подписчик
543 просмотра · 4 нед. назад
पितृपक्षासाठी खास बनवलेली भाजलेल्या तांदळाची पारंपरिक खीर 🙏🌸
तांदूळ आधी छान भाजून, भिजवून आणि दुधात शिजवल्यामुळे या खिरीला एक वेगळीच चव आणि सुगंध येतो. अगदी साध्या घरगुती साहित्यापासून बनणारी ही खीर पितृपक्षातील पारंपरिक स्वयंपाकासाठी नक्की करून पाहा. ❤️
साहित्य :
• १ कप तांदूळ
• १/२ लिटर दूध
• साखर – चवीनुसार
• 2–3 वेलची पूड
• 1–2 चमचे तूप
• आवश्यकतेनुसार पाणी
कृती : सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन त्यातील पाणी निथळून घ्या. कढईत तूप गरम करून तांदूळ मंद आचेवर छान भाजून घ्या.
भाजलेला तांदूळ थोडा थंड करून पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर भिजलेला तांदूळ थोडासा जाडसर वाटून घ्या.
एका भांड्यात दूध गरम करून त्यात वाटलेला तांदूळ घाला. मंद आचेवर तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत आणि खीर छान घट्ट होईपर्यंत शिजवा.
तांदूळ शिजल्यावर साखर आणि वेलची पूड घालून काही मिनिटे उकळा. सुगंधी आणि स्वादिष्ट तांदळाची खीर तयार! 😋❤️
रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment करा आणि Deepali Swadisht Mejwani चॅनेलला Subscribe ❤️ करा.
तुमच्या घरात ही खीर कोणत्या पद्धतीने बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 🌸
#पितृपक्ष #पितृपक्षस्पेशल #तांदळाचीखीर #भाजलेल्यातांदळाचीखीर #खीर #पारंपरिकरेसिपी #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #DeepaliSwadishtMejwani