Перейти к содержимому

ठाकरे गटाच्या शरद कोळींची एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी, काय आहे कारण? Sharad Koli UBT News

Azad Marathi

0:00 / 0:00

ठाकरे गटाच्या शरद कोळींची एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी, काय आहे कारण? Sharad Koli UBT News

156 просмотров · 11 ч назад
Azad Marathi
49,4 тыс. подписчиков
156 просмотров · 11 ч назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी MPDA कायद्यानुसार मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शरद कोळी यांना एका वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. कारवाईचे आदेश जाहीर झाल्यानंतर शरद कोळी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना सांगलीतून ताब्यात घेतलं आणि त्यानंतर येरवडा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. पण शरद कोळी नेमके कोण आहेत? सोलापूरच्या राजकारणात त्यांचा प्रवास कसा राहिला? ठाकरे गटात त्यांच्यावर कोणती जबाबदारी होती? आणि पोलिसांच्या माहितीनुसार त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? शरद कोळी यांच्यावर वाळू चोरी आणि तस्करी, खंडणी मागणे, धमकी देणे आणि प्रक्षोभक वक्तव्यांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यांच्यावर जवळपास नऊ गुन्हे दाखल असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. या प्रकरणांतील आरोप न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन आहेत. या संपूर्ण प्रकरणात MPDA कायद्याची कारवाई का करण्यात आली आणि शरद कोळी यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. #SharadKoli #SharadKoliNews #ShivSenaUBT #UddhavThackeray #Solapur #SolapurNews #MPDAAct #YerwadaJail #MaharashtraNews #MarathiNews #PoliticalNews #Shivsena #MaharashtraPolitics