Перейти к содержимому

Lalita tarakh | ‘११ उपोषणं झाली, पण अंतरवालीला मिळालं काय?’; ललिता तारख यांचा जरांगेंना थेट सवाल

Azad Marathi

0:00 / 0:00

Lalita tarakh | ‘११ उपोषणं झाली, पण अंतरवालीला मिळालं काय?’; ललिता तारख यांचा जरांगेंना थेट सवाल

96 просмотров · 10 ч назад
Azad Marathi
49,4 тыс. подписчиков
96 просмотров · 10 ч назад
‘११ उपोषणं झाली, पण अंतरवाली सराटीला मिळालं काय?’ असा थेट सवाल मराठा आंदोलनातील महिला आंदोलक ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील, त्यांच्या टीमची कार्यपद्धती आणि अंतरवाली सराटी येथील आंदोलनाबाबत अनेक गंभीर आरोप आणि प्रश्न उपस्थित केले. अंतरवाली सराटी येथे आतापर्यंत ११ उपोषणं झाली, प्रत्येक वेळी ‘हे माझं शेवटचं उपोषण’ असं सांगण्यात आलं, असा दावा तारख यांनी केला. या आंदोलनातून अंतरवाली गावाला आणि मराठा समाजाला नेमका काय फायदा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपण आंदोलनाबाबत प्रश्न विचारल्यानंतर सोशल मीडियावरून आपल्याला अश्लील शिवीगाळ, ट्रोलिंग, चारित्र्यहनन आणि धमक्या देण्यात आल्याचा आरोप ललिता तारख यांनी केला. AIच्या माध्यमातून अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून बदनामी केल्याची तक्रारही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आंदोलनासाठी काम करूनही आपली साधी विचारपूस झाली नाही, असा दावा करत तारख यांनी आंदोलनातील कथित आर्थिक व्यवहार, ‘पाकीट’ घेतल्याचे आरोप, शासन निर्णय म्हणजेच GR समाजासमोर स्पष्टपणे मांडले गेले का, तसेच अंतरवाली सराटी गावातील प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, यावरही प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर ट्रोलिंग करणाऱ्यांना पुढे करून त्यांच्यामागे ‘बोलवता धनी’ कोण आहे, असा सवाल करत ललिता तारख यांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र हे आरोप संबंधित व्यक्तींनी मान्य केले आहेत, असे समजण्याचे कारण नाही. यावेळी रेखा तारख यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात आल्याचेही ललिता तारख यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोणत्याही जाती-धर्माच्या महिलेवर अन्याय झाला तर तिच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका त्यांनी मांडली. ललिता तारख यांनी पत्रकार परिषदेत नेमके कोणते आरोप केले? मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले? सोशल मीडिया ट्रोलिंग आणि धमक्यांबाबत त्यांनी काय सांगितलं? पाहा संपूर्ण बातमी. #ललिता_तारख #LalitaTarakh #मनोजजरांगे #ManojJarange #मराठाआंदोलन #MarathaAndolan #अंतरवालीसराटी #AntarwaliSarati #मराठाआरक्षण #MarathaReservation #मराठासमाज #MarathaCommunity #MarathaNews #MaharashtraNews #MarathiNews #MarathaProtest #SocialMediaTrolling #LalitaTarakhNews