Bible Vachan 16-09-2026
यहोवा देवबाप
0:00 / 0:00
Bible Vachan 16-09-2026
30 просмотров · 9 дней назад
यहोवा देवबाप
181 подписчик
30 просмотров · 9 дней назад
यहोशवा २४:२० जर तुम्ही यहोवा देवाला सोडून परक्या देवांची सेवा कराल तर त्याने तुमचे बरे केल्यानंतरही तो उलटून तुमचे वाईट करील, आणि तुमचा क्षय करील
यहोशवा २४: १४,१६-२५
यहोशवा हा मोशेचा दास होता. मोशे मेल्यानंतर यहोवा देवाने यहोशवाशी संभाषण करण्यास सुरुवात केली, तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, यहोवा इस्त्राएलचा देव असे म्हणतो, पूर्वकाळी तुमचे पूर्वज आणि अब्राहामाचा बाप व नाहोराचा बाप, म्हणजेच तेरह; हे नदीच्या पलीकडे राहत होते आणि त्यांनी अन्य देवांची सेवा केली; त्यामुळे यहोवा देव म्हणतो, मी तुम्हांपुढे गांधील माशा पाठवल्या आणि त्यांनी अमो-यांच्या दोन राजांना तुमच्या समोरून घालवले; ते तुमच्या तलवारीने किंवा धनुष्याने झाले नाही तर ते मी केले तर आता पूर्णतेने व सत्येने यहोवाचे भय धरून त्याची सेवा करा. तुमच्या पूर्वजांनी मिसरास ज्या देवांची सेवा केली त्यांना दूर करा आणि तुम्ही फक्त यहोवा देवाचीच सेवा करा. तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले कि, अन्य देवांची सेवा करण्यास आम्ही यहोवा देवाला सोडून दयावे हे आम्हांपासून दूरच असो! कारण यहोवा आमचा देव, आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशांतून, दास्याच्या घरातून, वर काढून आणले; आणि यहोवा देवानेच आमच्या देखत मोठे चमत्कार केले; आणि आम्हांला घेऊन येताना सर्व लोकांमधून, सर्व संकटापासून ,सर्व शत्रुपासून आमचे रक्षण केले आणि यहोवा देवाने सर्व लोकांना, या देशात राहणारे अमोरी यांनादेखील, आम्हांकडून लढाई न करता घालवून दिले. म्हणून आम्हीही यहोवा देवाची सेवा करू. आपण एकच यहोवा देवाची सेवा करतो काय? कि संतांच्या मुर्त्या बनवून स्वत:ला व लोकांनाही त्यांच्या उद्धारापासून परावृत्त करतो? त्यांचे रक्त यहोवा देव तुमच्याकडे मागणार आहे; ह्याची आठवण ठेवा.
अनुवाद १८:१८ थोर भविष्यवादी जो येशू त्याच्याविषयी भविष्यवचन
यहोवा देव मोशेला म्हणतो,‘ मी त्यांच्या भावांमधून तुझ्यासारख्या भविष्यवादयाला (येशूला ) उठवून उभा करीन, आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात घालीन; आणि मी त्याला आज्ञा करीन ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल आणि असे होईल की, यहोवा देव म्हणतो, येशू ख्रिस्त माझ्या नावाने बोलेल ते शब्द जो कोणी ऐकणार नाही त्याच्याजवळ मी त्याचा हिशेब मागुन घेईन.’
मत्तय १८:६
यहोवा देवाच्या आज्ञेने येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लहानातील एकाला अडखळविल त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे हे त्याच्या फायद्याचे आहे.
मग लोकांनी यहोवा देव हा आमचा एकमेव देव आहे असे म्हटल्यावर, यहोशवाने लोकांना म्हटले, तुमच्याने यहोवा देवाची सेवा करवत नाही; कारण तो पवित्र देव आहे, तो आवेशी देव आहे, तो तुमच्या उल्लंघनांची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. जर तुम्ही यहोवा देवाला सोडून परक्या देवांची सेवा कराल तर त्याने तुमचे बरे केल्यानंतरही तो उलटून तुमचे वाईट करील, आणि तुमचा क्षय करील. तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, असे आमच्याकडून होणार नाही; तर आम्ही यहोवा देवाचीच सेवा करु. आज जगामध्ये यहोवा देव सोडून इतर सर्वांची पूजा व आराधना चालू आहे. यहोवा हे त्याचे नावही घ्यायला कोणी तयार नाहीत. हे चालले आहे ते बरोबर आहे काय? कि त्याने आपणांला दिलेले आशीर्वाद फिरवून तो आपले वाईट करील. आज जगामध्ये करोना व इतर रोग, ढगफुटी , भूकंप हे चालू आहेत कारण मानवाने यहोवा देवाचे नाव पवित्र मानले नाही व त्या एकटयाचीच सेवा केली नाही, तर त्याला सोडून इतर संताची व त्याने निर्माण केलेल्या माणसांची स्तुती व आराधना चालु आहे. मग यहोशवा लोकांना म्हणाला, तुम्हीच तुमचे साक्षी आहा कि, तुम्ही यहोवाची सेवा करायला त्याला आपणासाठी निवडून घेतले आहे आणि लोकांनी म्हटले, आम्ही त्याचे साक्षी आहोत. मग यहोशवा बोलला, तर आता तुम्हांमध्ये जे परके देव आहेत ते दूर करा. आपण यहोवा देवाला सोडून संतांची स्तुती, आराधना करतो काय? ते बंद करणार आहोत का? आणि तुम्ही आपले हृदय एकच देव यहोवा इस्त्राएलचा देव ह्याच्याकडे वळवा. तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, यहोवा आमचा देव व सर्व जगाचा देव याचीच सेवा आम्ही करु आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकू. याप्रमाणे त्यादिवशी यहोशवाने लोकांशी करार केला. आणि यहोवा देवाच्या आज्ञा, नियम व विधी लोकांना लावून दिले.
आपण यापुढे यहोवा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या आज्ञाप्रमाणे एकच यहोवा देवाची स्तुती आराधना करणार आहेत काय? किंवा आपल्या प्रतिष्ठेसाठी आजपर्यत जे चालत आले आहे तेच पुढे चालु ठेवणार आहेत? आपण आपल्या उध्दारासाठी व जगाच्या उध्दारासाठी तसेच यहोवा देवाकडून आपल्यावर कुठचेही संकट येऊ नये म्हणून यहोवा देवाने दिलेल्या आज्ञाप्रमाणे चालणार आहोत कि आपल्या पूर्वजांनी व आईवडिलांनी किंवा ख्रिस्तसभेने जे शिकवले त्याप्रमाणे चालणार आहोत? आपण यहोवा देवाने व येशू ख्रिस्ताने वांरवार संदेष्टयाद्वारे आज्ञा व नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे एकच यहोवा देवाला भजुया म्हणजे यहोवा देवाने पाठवलेली संकटे आपणांवर येणार नाहीत. हाललू याह आमेन.
श्री. अॅथोनी जॉन परेरा
यहोवा देवाचा सेवक ( परेरा बिल्डर्स)