Перейти к содержимому

Bible Vachan 09-09-2026

यहोवा देवबाप

0:00 / 0:00

Bible Vachan 09-09-2026

12 просмотров · 2 недели назад
यहोवा देवबाप
181 подписчик
12 просмотров · 2 недели назад
ख्रिस्त पुन: येणार म्हणून आपली वर्तणूक पवित्र असावी; कारण त्यावेळेला आकाश पेटून विरघळेल. २ पेत्र ३:११ ते १८ पवित्र आत्म्याच्या साहाय्याने पेत्र लिहितो की, येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर सर्व पृथ्वी अशी विरघळणार यावरून तुम्ही पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत असे लोक असावे. येशू ख्रिस्त येण्याची वेळ जवळ आली आहे; व येण्याच्या त्या दिवसामध्ये आकाश पेटून विरघळेल, व मूळद्रव्य अतिउष्णतेने वितळतील, तो दिवस येण्याची तुम्ही वाट पाहात असावे व तो लवकर यावा म्हणून उतावळीही करीत असावे. आज जगामध्ये तसेच भारतामध्ये तापमान जवळ-जवळ ४५ ते ५० डिग्री पर्यंत झालेले आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस व गारा पडत आहेत,भूमिकंप होत आहेत. तसेच यहोवा देवाच्या वचनाप्रमाणे, ज्यांमध्ये न्यायीपण राहते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची तुम्ही वाट पाहात आहा. प्रकटीकरण २१:१० ‘तेव्हा त्याने मला आत्म्यात मोठया व उंच डोंगरावर नेले व पवित्र नगर, यरूशलेम, देवापासून आकाशातून उतरत असलेले मला दाखवले. यास्तव प्रियांनो, यांची वाट पाहात असता तुम्ही यहोवा देवाला निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असता सापडावे म्हणून प्रयत्न करा, आणि आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारण आहे असे लेखा. तसेच आपला प्रिय भाऊ पौल हयाला यहोवा देवाने दिलेल्या आत्म्याने लिहीले आहे. २ पेत्राचे पत्र १:२१ ‘ कारण भविष्यवाद कधी माणसांच्या इच्छेने आला नाही तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरले होते ते देवापासून बोलले. तसाच पौलाला यहोवा देवाने आत्मा दिल्यामुळे त्याने पुष्कळ पत्रे लिहिली. व त्या पत्रामध्ये समजायला अवघड अशा काही गोष्टी आहेत. जे अज्ञानी व अस्थिर ते आपलाच नाश होण्यासाठी इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसाच या गोष्टीचा ही अर्थ ओढूनताणून विपरीत करतात. काहीजण संतानी लिहिलेल्या गोष्टीवरून शिक्षण देतात, ते बरोबर नाही. तर प्रियांनो, तुम्हांला हे अगोदरच माहित आहे म्हणून अधार्मिकांच्या भुलीने ओढले जाऊन तुम्ही आपल्या स्थिरपणातून पडू नये तर तुम्ही ज्या बायबल व्यतिरिक्त गोष्टी सांगतात त्या ऐकून त्या आत्मसात करू नये म्हणून जपा. तर तुम्ही आपला प्रभु यहोवा देव, तारणारा व मुक्तीदाता येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जा. त्यांना आता आणि सर्वकाल गौरव आहे आमेन. आपण यहोवा देवाच्या पहिल्या आज्ञेप्रमाणेच एकच यहोवा देवाला भजूया व आपल्या विनंत्या व आपली गा-हाणी यहोवा देवाकडे येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थिने ठेवूया म्हणजे यहोवा देव आपल्या विनंत्या मान्य करील . हाललु याह आमेन. श्री. अॅथोनी जॉन परेरा, यहोवा देवाचा सेवक ( परेरा बिल्डर्स)