Перейти к содержимому

दत्तगुरुकृपा म्हणजे काय? dattaguru krupa

Gurumauli गुरुमाऊली

0:00 / 0:00

दत्तगुरुकृपा म्हणजे काय? dattaguru krupa

996 просмотров · 2 нед. назад
Gurumauli गुरुमाऊली
92,8 тыс. подписчиков
996 просмотров · 2 нед. назад
दत्तगुरुकृपा म्हणजे काय? ‪@gurumauli2021‬ गुरु कृपा म्हणजे काय? नमस्कार दत्त भक्तांनो आपण पहात आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास.आजचा विषय आहे गुरुकृपा म्हणजे काय? मित्रांनो भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील.गुरु कृपा हा एक संस्कृत शब्द आहे,. गुरु या शब्दाचा अर्थ “शिक्षक” असा होतो आणि सामान्यतः तो आध्यात्मिक गुरू किंवा मार्गदर्शकासाठी वापरला जातो. कृपा म्हणजे “कृपा” किंवा “अनुग्रह”, आणि हे भक्ती योगातील एक प्रमुख तत्त्व आहे, तसेच हिंदू धर्मातील दैवी कृपेची संकल्पना आहे.गुरुकृपेचे या जगात अनेक मार्ग आहेत. अनेक साधना आहेत. अनेक उपाय आहेत. परंतु ज्या साधकाच्या मस्तकावर सद्गुरूंचा वरदहस्त आहे त्याला कोणत्याही मार्गावर अडथळा येत नाही. गुरुकृपा ही केवळ आशीर्वादाची गोष्ट नाही. ती एक जिवंत शक्ती आहे. ती साधकाच्या आत उतरते आणि त्याचे जीवन आतून बदलून टाकते.आध्यात्मिक किंवा व्यावहारिक जीवनात गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिष्याची प्रगती होणे, म्हणजे गुरुकृपा होय. गुरुकृपेशिवाय ईश्वराची प्राप्ती आणि आत्मज्ञान अशक्य मानले जाते. जीवनाच्या कठीण प्रसंगात गुरु योग्य दिशा दाखवून शिष्याचा उद्धार करतात.असाध्य गोष्टी साध्य होतात: गुरुकृपा पाठीशी असेल तर अशक्य गोष्टीही सहज शक्य होतात. गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभांनी आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी हेच वारंवार सांगितले आहे की ईश्वरप्राप्तीचा खरा मार्ग हा बाहेरच्या कर्मकांडात नाही तर आतल्या शरणागतीत आहे. एखादा दिवा लावायला काडी लागते. एखादे बीज उगवायला पाणी लागते. तसेच साधकाच्या जीवनात ज्ञानाचा उदय होण्यासाठी गुरू लागतात. गुरू हे केवळ शिकवणारे नाहीत. ते स्वतः प्रकाश आहेत. त्यांच्या सान्निध्यात नुसते बसले तरी साधकाच्या मनातील काळोख विरायला लागतो. हे सांगणे अतिशयोक्तीचे वाटेल परंतु ज्यांनी गुरूंचा सहवास अनुभवला आहे त्यांना हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही.दत्तगुरूंची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहिसा झाला पाहिजे. ज्या वेळेस आपले ह्दय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. आणि त्यात दत्तकृपा झाली, तर आयुष्याचे सोनेच होईल अशी सद्भक्तांची भावना असते. यासाठी ते विविध ग्रंथांचे, स्तोत्राचे पारायण करतात. जप जाप्य करतात.दत्तगुरूंची कृपा हा एक सुखद अनुभव आहे , जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही , भीती वाटत नाही तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला कि मग आपण आपले राहातच नाही . त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते ह्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते .दत्तगुरुकृपा म्हणजे थेट भेट ह्या मनाची त्या मनाशी , ह्या हृदयाची त्या हृदयाला .. #dattabhakti #dattadigambardaivatmaze #dattaupasna #dattapooja #dattamantra #dattabhajan #datta #dattaguru #gurudevdatta #shreeswamisamarth #dattatreya #shreenrusihasaraswati #dattabhakti #bhakti #dharmik #devotional #marathi #marathivlog #marathiviralvideo #viral #trending #sayali