Перейти к содержимому

गाणगापूर येथील माधुकरी सेवा

Gurumauli गुरुमाऊली

0:00 / 0:00

गाणगापूर येथील माधुकरी सेवा

915 просмотров · 2 недели назад
Gurumauli गुरुमाऊली
92,9 тыс. подписчиков
915 просмотров · 2 недели назад
गाणगापूर येथील माधुकरी सेवा ‪@gurumauli2021‬ “मधुकरी मागणे नव्हे, तर मुक्तीची साधना” नमस्कार दत्त भक्तांनो आपण पहात आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास.आजचा विषय आहे. दत्त संप्रदायातील माधुकरी सेवा मित्रांनो मधुकरी किंव्हा माधुकरी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या मनात दारोदार भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीचे चित्र उभे राहते. काहींना तो दारिद्र्याशी जोडलेला वाटतो, काहींना तो मागासलेपणाचे प्रतीक भासतो, तर आधुनिक विचारसरणीत माधुकरी म्हणजे आत्मसन्मान गमावून जगणे, अशीही समजूत आढळते. परंतु भारतीय अध्यात्मपरंपरेत, विशेषतः संतपरंपरेत, माधुकरी हा शब्द जितका साधा वाटतो तितकाच तो अर्थाने खोल, व्यापक आणि तात्त्विक आहे. माधुकरी म्हणजे केवळ अन्न मागणे नव्हे; माधुकरी म्हणजे अहंकाराचे विसर्जन, आसक्तीचे क्षालन, आणि समाजाशी नाते जोडतही अंतर्मुख राहण्याची साधना..मधुकर म्हणजे मधमाशी या शब्दापासून बनवलेले भाववाचक नाम,म्हणजे माधुकरी . ज्याप्रमाणे मधुकर हा,प्रत्येक फुलातील मध गोळा करतो,त्याप्रमाणे गुरूगृही शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ,पाच घरी तयार अन्न, भिक्षा मागून खावे,याला माधुकरी म्हणतात. मधमाशी कोणत्याही एका फुलावर तुटून पडत नाही. ती प्रत्येक फुलावरून थोडेथोडे मध गोळा करते. कोणत्याही फुलाचे नुकसान न करता, कोणावरही ओझे न बनता, ती आपले कार्य पूर्ण करते. साधकानेही समाजात असेच वागावे, ही माधुकरीमागची मूळ भावना आहे. एकाच व्यक्तीवर अवलंबून न राहता, कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता, जे मिळेल ते स्वीकारणे आणि जे मिळणार नाही त्याबद्दल खंत न बाळगणे, हा मधुकरीचा आत्मा आहे.मानवी जीवनात अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. “मी कर्ता आहे”, “मी कमावतो”, “मी पात्र आहे” या भावना माणसाला सतत अस्वस्थ ठेवतात. माधुकरी या अहंकाराला रोज थोडेथोडे झिजवते. दारोदार फिरताना साधकाला स्वतःचे नाव, ओळख, प्रतिष्ठा यांचा विसर पडतो. तो केवळ एक जिज्ञासू जीव राहतो, ज्याला देहासाठी थोडे अन्न हवे आहे. या अवस्थेत अहंकार टिकू शकत नाही. दत्त संप्रदायात 'माधुकरी' म्हणजे भिक्षा मागून किंवा गोळा करून अन्न ग्रहण करण्याची एक अत्यंत पवित्र, प्राचीन परंपरा आहे. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या २४ गुरूंमध्ये 'मधमाशी' कडून हा गुण शिकला होता की, अन्न हे फक्त भूक भागवण्यापुरतेच घ्यावे दत्त क्षेत्रातील माधुकरी सेवा ही दत्त संप्रदायातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाची साधना मानली जाते. गाणगापूर, औदुंबर, आणि नरसोबाची वाडी यांसारख्या प्रमुख दत्त क्षेत्रांमध्ये ही सेवा आजही अत्यंत श्रद्धेने केली जाते. या सेवेत साधक किंवा भावीक हातात झोळी किंवा द्रोण घेऊन कमीत कमी ५ घरांतून भिक्षा मागतो. भिक्षा मागताना 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' किंवा 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' असा नामजप केला जातो.महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र श्री क्षेत्र गाणगापूर येथे अशी श्रद्धा आहे की, भगवान श्री नृसिंह सरस्वती रोज दुपारी माधुकरी मागण्यासाठी येतात. म्हणून गाणगापूर हे माधुकरी सेवेचे मुख्य केंद्र आहे. स्वामी श्री नृसिंह सरस्वती यांनी स्वतः सांगितले आहे की, "मी रोज दुपारी गाणगापुरात माधुकरी मागण्यासाठी येतो." त्यामुळे येथे येणारा प्रत्येक भक्त स्वतः माधुकरी मागतो किंवा भिक्षेकऱ्यांना माधुकरी वाढतो.दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्रीमहाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात.मंदिराजवळ भाविक द्रोण घेऊन कमीत कमी ५ घरांमध्ये माधुकरी मागण्यासाठी जातात.प्रसाद: भिक्षेत मिळालेले अन्न एकत्र करून ते 'दत्तप्रसाद' म्हणून ग्रहण केले जाते.श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे कृष्णा नदीच्या तीरावर दत्त प्रभूंचे वास्तव्य मानले जाते. या क्षेत्रातही दुपारी १२ ते १२:३० च्या दरम्यान माधुकरी मागण्याची आणि भक्तांना अन्नदान करण्याची मोठी परंपरा आहे तसेच श्री क्षेत्र औदुंबर या शांत आणि पवित्र क्षेत्रात औदुंबर वृक्षाच्या छायेत साधक माधुकरी मागून आपली साधना पूर्ण करतात.माधुकरी ही केवळ पोट भरण्याची क्रिया नसून ती वैराग्याची कसोटी आहे. अन्न देणारा मनुष्य नसून परमेश्वरच आहे, अशी भावदृष्टी ठेवल्याने देणारा-घेणारा हा भेदच नष्ट होतो.सर्वांनी भिक्षा मागावी, असा याचा अर्थ नाही; पण प्रत्येकाने आपल्या गरजा मर्यादित कराव्यात, उपभोगावर संयम ठेवावा, आणि निसर्ग व समाजावर अनावश्यक ताण टाकू नये, हा संदेश माधुकरी देते. #ganagapur #madhukari #karnataka #nrusinhwadi #audumbar #bhiksha #datta #dattaguru #gurudevdatta #shreeswamisamarth #dattatreya #shreenrusihasaraswati #dattabhakti #bhakti #dharmik #devotional #marathi #marathivlog #marathiviralvideo #viral #trending #sayali