देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी | Devi Tuz Rup Mala Avadal Sundari
स्वरदर्पण
0:00 / 0:00
देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी | Devi Tuz Rup Mala Avadal Sundari
262 345 просмотров · 4 года назад
स्वरदर्पण
28,2 тыс. подписчиков
262 345 просмотров · 4 года назад
गाण्याचे बोल:
देवी तुझं रूप मला
देवी तुझं रूप मला आवडलं सुंदरी
आनंदलं मन माझं शुभ्र फूल मोगरी || धृ ||
अंगावरी साडी चोळी हिरवी हिरवीगार गं
नेटकाच बांधा कसा झोक डौलदार गं
हळदी कुंकवाचं तेज शोभलं मुखावरी || १ ||
नथ कुड्या घोस बुगड्या मोतियांचा वेल गं
भांगावरी बिंदी शोभे वेणीवरी फूल गं
लखलख करिते गं गळ्यातली गळसरी || २ ||
गोठ तोडे हिरवे चुडे माळेवरी माळ गं
हार तुरे डोलती गं पायी वाजे पैंजण
वैभवाला पुजू या गं लक्ष्मी तू साजरी || ३ ||
आनंद भजनी मंडळ, धनकवडी पुणे