Перейти к содержимому

Bible Vachan 30-10-2026

यहोवा देवबाप

0:00 / 0:00

Bible Vachan 30-10-2026

23 просмотра · 7 дн. назад
यहोवा देवबाप
182 подписчика
23 просмотра · 7 дн. назад
माणसाने यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळावे म्हणून यहोवा देवाने त्याचा क्रोध इस्राएलावर ओतला यशया ४२:१८-२५ यशया भविष्यवाद्याला यहोवा देवाने देवाचा सेवक ख्रिस्त याविषयी भविष्य सांगितले. त्यामध्ये देवाचे सेवक इस्राएल यांचा आंधळेपणा बददल यहोवा देव म्हणतो, बहि-यांनो तुम्ही ऐका; आंधळयांनो तुम्हांला दिसावे म्हणून तुम्ही पाहा. माझ्या सेवकावाचून आंधळा कोण आहे? आणि जो दूत मी पाठवतो त्याच्यासारखा कोण बहिरा आहे? माझ्याशी शांतीने असणा-यासारखा आंधळा कोण आहे? आणि यहोवाच्या सेवकासारखा आंधळा कोण आहे? यहोवा देव याजकांना म्हणतो, तु बहुत गोष्टी पाहत असतोस पण त्या ध्यानात आणीत नाहीस; त्याचे कान उघडे असतात, पण तो ऐकत नाही. यहोवा देव आपल्या न्यायीपणामुळे नियमशास्त्राला मोठेपण दयायला आणि ते प्रतिष्ठीत करायला संतुष्ट झाला. तरी हे लोक लुटलेले व लुबाडलेले आहेत; ते सगळेच खाचांमध्ये पाशात पडलेले आहेत; आणि ते बंदीच्या घरांमध्ये लपवलेले आहेत; ते शिकार असे झाले आहेत, आणि कोणी सोडवणारे नाही; ते लूट असे झाले आहेत, आणि, परत कर, असे कोणी म्हणत नाही. यहोवा देव म्हणतो, याकडे कान देईल, पुढल्या काळासाठी कान देऊन ऐकेल असा कोण तुम्हांमध्ये आहे? लुटीला याकोब व लुटणा-यांना इस्त्राएल (ख्रिस्ती लोक) कोणी दिला? ज्याच्याविरुद्ध आम्ही पाप केले, याकोबाच्या घराण्याने व इस्रायलाच्या घराण्याने पाप केले त्यासाठी यहोवा देवानेच त्यांना शिक्षा दिली नाही काय? कारण त्यांनी यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळले नाहीत व त्याच्या मार्गात चालले नाहीत, आणि त्याचे शिक्षण ते ऐकेनात याकरिता यहोवा देवाने आपल्या क्रोधाची तीव्रता व युद्धाचा पराक्रम त्यांच्यावर ओतला आहे, आणि त्याने त्याला सभोवती आग लावली आहे तरी त्यांना ते समजेना, आणि त्यांना जाळले तरी ते मनावर घेत नाहीत. यहोवा परमेश्वर त्याने दिलेल्या आज्ञा व नियम न पाळणा-यांना क्षमा करत नाही. मोशे त्याचा आवडता सेवक त्याच्याशी यहोवा देव तोंडो तोंड बोलत असे परंतु त्याच्या एका चुकीमुळे त्याला दुधामधाच्या देशात तु जाणार नाहीस असे सांगितले. मोशेने दुसऱ्यांदा त्याविषयी विचारले तर यहोवा देवाने सांगितले याविषयी तु पुन्हा मला विचारायचे नाही. तर आज जगामध्ये यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम सोडून दुस-या सगळ्या आज्ञा पाळल्या जातात. तर आपल्याला काय वाटते, यहोवा देव आपल्याला क्षमा करील? तर नाही. आपण मात्र एकच यहोवा देवाला भजून व त्याच्या आज्ञा व नियम पाळून यहोवा देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करूया; म्हणजे त्याचा क्षोभ आपल्यावर येणार नाही. हाललु याह आमेन. श्री. अॅन्थनी जॉन परेरा यहोवा देवाचा सेवक ( परेरा बिल्डर्स)