बुमरा नसल्याचा फायदा झाला
Sunandan Lele Cricket & Beyond
0:00 / 0:00
बुमरा नसल्याचा फायदा झाला
17 859 просмотров · 8 ч назад
Sunandan Lele Cricket & Beyond
155 тыс. подписчиков
17 859 просмотров · 8 ч назад
जुने जाणते लोक सांगतात की पालकांचे कृपाछत्र असे पर्यंत घरच्या करत्या व्यक्तीला अपेक्षित जबाबदारीची जाणीव होत नाही. पालक नसले की एकदम प्रगल्भ झाल्यासारखे वाटते. अगदी तशीच काही घटना ऑकलंडच्या ईडन पार्कवर होताना दिसली. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज जसप्रीत बुमरा संघात नसल्याने वेगवान गोलंदाजांचा नेता अर्षदीपसिंग बनला. त्याने प्रभावी गोलंदाजी आणि समंजस मार्गदर्शन उरलेल्या तीन तरुण गोलंदाजांना केले. भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला ज्यात मोठा वाटा चार वेगवान गोलंदाजांचा होता.