Перейти к содержимому

अभिषक शर्माची तांडव फलंदाजी

Sunandan Lele Cricket & Beyond

0:00 / 0:00

अभिषक शर्माची तांडव फलंदाजी

19 874 просмотра · 4 часа назад
Sunandan Lele Cricket & Beyond
155 тыс. подписчиков
19 874 просмотра · 4 часа назад
आक्रमक फलंदाजी करून न्यूझीलंडने ३ बाद १९७चा कष्टाने उभारलेला धावफलक भारतीय फलंदाजांना मोठा वाटला नाही. पहिल्या षटकापासून घणाघाती हल्ला गोलंदाजांवर चढवताना अभिषेक शर्माने ३८ चेंडूत ११३ धावा काढताना ९ चौकार ११ षटकारांची खेळी सादर केली. अभिषेक शर्मा – वैभव सूर्यवंशीने पहिल्या ६ षटकात ११३ धावांचा विक्रम मागे टाकताना ११८ धावा फलकावर लावल्या. भारतीय संघाने तिसरा सामना जिंकला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० विजयी आघाडी घेतली. १३.२षटकात विजय नक्की करताना तीन भारतीय फलंदाजांनी मिळून १६ चौकार आणि १५ षटकार मारून प्रेक्षकांना खूश केले. फलंदाजीचे तांडव सादर करत वेगवान शतक करणाऱ्या अभिषेक शर्माला एकमुखाने सामन्याचा मानकरी घोषित करण्यात आले.