🌺✨ GLOBAL GANESH FESTIVAL 2025 WINNER AMONG 77 COUNTRIES✨🌺
Marathi Mitra Kampala Association
0:00 / 0:00
🌺✨ GLOBAL GANESH FESTIVAL 2025 WINNER AMONG 77 COUNTRIES✨🌺
899 просмотров · 6 месяцев назад
Marathi Mitra Kampala Association
75 подписчиков
899 просмотров · 6 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
श्री गणेश ग्लोबल फेस्टिव्हल २०२५
मराठी मित्र कंपाला असोसिएशन युगांडा
प्रथम क्रमांकाचा (Rank 1) विजेता ठरला आहे!
आम्ही मराठी…
आमचा महाराष्ट्र…
आणि आमच्या मराठी संस्कृतीचा आम्हाला मनापासून अभिमान आहे!
सर्वांना मनःपूर्वक नमस्कार.
युगांडामध्ये भारतीय संस्कृती मोठ्या उत्साहाने आणि आपुलकीने जपली व साजरी केली जाते. त्यामध्ये महाराष्ट्राचा श्री गणेशोत्सव हा आमच्यासाठी विशेष जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा उत्सव आहे.
आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमानाने सांगावेसे वाटते की, जागतिक पातळीवरील “श्री गणेश ग्लोबल फेस्टिव्हल २०२५” या स्पर्धेत “मराठी मित्र कंपाला असोसिएशन” – युगांडा यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे!
या स्पर्धेत जगभरातील ७७ देशांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक व्यासपीठावर युगांडाचे प्रतिनिधित्व करताना आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर मांडताना आम्हाला विशेष आनंद झाला.
जन्मभूमी महाराष्ट्र…
कर्मभूमी आफ्रिका…
आणि हृदयात सदैव महाराष्ट्र!
सातासमुद्रापार राहूनही आपल्या मातीतली संस्कृती, परंपरा, संस्कार आणि श्रद्धा मनापासून जपण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आमच्या आई-वडिलांचे संस्कार आणि श्री गणेशासह आपल्या देवी-देवतांचा आशीर्वाद यामुळेच हा प्रवास अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण झाला आहे.
“मराठी मित्र कंपाला असोसिएशन” ही संस्था युगांडामध्ये मराठी संस्कृती आणि परंपरांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे. मात्र संस्कृती जपण्याबरोबरच समाजाप्रती आपली जबाबदारीही आम्ही तितक्याच मनापासून जपतो. आफ्रिकन समाजाप्रती योगदान म्हणून आम्ही शाळांच्या नूतनीकरणासाठी, आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी तसेच आई-वडिलांचे छत्र नसलेल्या गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो.
आमच्या मंडळातर्फे श्री गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव, तसेच गुढीपाडवा आणि दिवाळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आम्ही शाळांच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करतो. आपल्या संस्कृतीतील मूल्ये आणि समाजसेवा यांची सांगड घालण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती. आमची आकर्षक सजावट, विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि गणेशोत्सवातील प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बारकावे जपण्याचा आमचा प्रयत्न यामुळे आम्हाला या जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवता आला. सातासमुद्रापार आफ्रिकेच्या भूमीत राहून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपता आली आणि ती जगासमोर मांडता आली, याचा आम्हाला मनापासून अभिमान आणि आनंद आहे.
जगभरातील ७७ देशांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. पण हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा किंवा काही मोजक्या लोकांचा नाही
हा प्रत्येक सदस्याच्या मेहनतीचा, एकजुटीचा आणि सांघिक कार्याचा सन्मान आहे.
नोकरी, व्यवसाय, कुटुंब आणि दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून बाप्पासाठी वेळ देणाऱ्या प्रत्येक सदस्याचे योगदान अमूल्य आहे.
या प्रवासात प्रत्येकाने आपापल्या परीने दिलेला वेळ, मेहनत, कल्पना आणि प्रेम यामुळेच हा विजय शक्य झाला.
"मराठी मित्र कंपाला असोसिएशन”चा एक भाग असल्याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे आणि हे आमचे खरे भाग्य आहे. “ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५” चे विजेते म्हणून आम्हाला सन्मानित केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
हा आमचा १० मिनिटांचा व्हिडिओ आहे.
तो नक्की पहा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून युगांडामध्ये मराठी समाजाने जपलेली आपली संस्कृती आणि बाप्पाप्रतीची आपली श्रद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि जगभर पोहोचेल.
धन्यवाद! 🙏
मराठी मित्र कंपाला असोसिएशन
आमचे संस्थापक सदस्य, सर्व माजी व विद्यमान सदस्य, स्वयंसेवक आणि मुख्य समिती सदस्य यांचे मनःपूर्वक आभार.
हा पुरस्कार आपल्या सर्वांचा आहे!
कार्यकारिणी
श्री. सचिन गुप्ते – अध्यक्ष
श्री. संजय वडस्कर – उपाध्यक्ष
श्री. रुपेश विजय शेलार – खजिनदार
सौ. संजीवनी गायकवाड – सचिव
सौ. रश्मी कोरी – समिती सदस्य
सौ. अंजली पुजारी – समिती सदस्य
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
जय महाराष्ट्र! 🙏