Перейти к содержимому

बातमीपत्र:11/9/26:भीषण अपघातात तीन ठार तर पोळ्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा

युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live

0:00 / 0:00

बातमीपत्र:11/9/26:भीषण अपघातात तीन ठार तर पोळ्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा

22 176 просмотров · 1 день назад
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
21 тыс. подписчиков
22 176 просмотров · 1 день назад
बीड अहिल्यानगर महामार्ग वर नवगण राजुरी च्या पुढे उखंडा तलावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री एका भरधाव ट्रकने दुचाकी ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील तिघे मित्र जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली, मृतांमध्ये कैलास टुले वय 30 वर्षे, अक्षय शिंदे वय 25 वर्षे आणि ऋषिकेश फुलझळके वय 27 वर्षे सर्व राहणार नवगण राजुरी तालुका जिल्हा बीड यांचा समावेश आहे, गुरुवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या दरम्यान हे तिघे मित्र दुचाकीवरून गावाकडे जात होते दरम्यान ते उखंडातलावा जवळील ठिकाणी पुलाचे काम सुरू असून त्या ठिकाणी आले असता, त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली, त्यामुळे भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी हि ट्रकच्या टायरखाली अडकली व तिघांचाही जागीच मृत्यू झाला, अपघात घडल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला, दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ली, एकाच दिवशी तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नवगण राजुरी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, दरम्यान ज्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा दिशादर्शक फलक, रेडियम पट्टे अथवा पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप राजुरी ग्रामस्थांनी केला असून सदरचे काम हे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून रस्त्यावर पूल किंवा इतर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी दिशादर्शक फलक, रेडियम पट्टे, बॅरिकेटिंग किंवा इतर काही सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे, मात्र उखंडा तलावाजवळ चालू असलेल्या पुलाच्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळेच हा अपघात झाला आणि यामध्ये निष्पाप तीन निष्पाप तरुणांचा जीव गेला, सदर ठिकाणी काम सुरू आहे की मृत्यूचा सापळा उभारला जात आहे?असा संतप्त सवाल आता नागरिक व प्रवाशांकडून विचारला जात आहे, तसेच या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे