Перейти к содержимому

रामरक्षा प्रवचन-५० | स्मार्टनेस की ताकद? - ‘दशमुखांतक’ श्रीराम उलगडत असलेला राजमार्ग |Aniruddha Bapu

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

0:00 / 0:00

रामरक्षा प्रवचन-५० | स्मार्टनेस की ताकद? - ‘दशमुखांतक’ श्रीराम उलगडत असलेला राजमार्ग |Aniruddha Bapu

16 556 просмотров · 2 мес. назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
350 тыс. подписчиков
16 556 просмотров · 2 мес. назад
गेल्या वेळच्या रामरक्षेवरील प्रवचनात, ‘जानुनि सेतुकृत् पातु’ ह्या पंक्तीवरील विवेचनात, ‘आमच्या जीवनासाठी अत्यावश्यक असणारा रामसेतू कुठला व तो प्रभु श्रीराम आमच्या जीवनात कसा बांधतात’ हे स्पष्ट केल्यानंतर, दि. २ फेब्रुवारी २००६ रोजी केलेल्या रामरक्षेवरील प्रवचनात सद्गुरु अनिरुद्ध बापू, त्यापुढील पंक्तीवर म्हणजेच ‘जंघे दशमुखांतक:’ अर्थात - ‘दशानन रावणाचा अंत करणारा राम माझ्या पोटर्‍यांचे रक्षण करो’ ह्या अर्थाच्या पंक्तीवर विवेचन करीत आहेत. सर्वप्रथम एका डॉक्टरच्या भूमिकेतून ते नेहमीप्रमाणे पोटर्‍यांचे शरीररचनेतील स्थान स्पष्ट करून, हे अंग आमच्या आरोग्यासाठी, अगदी नियमित जिममध्ये जाणार्‍या बॉडीबिल्डरसाठी देखील कसे महत्त्वाचे आहे हे समजावून सांगतात. पूर्वीच्या साध्या व्यायामशाळा आणि आत्ताची अत्याधुनिक सोयी असलेली जिम्स ह्यांची तुलना करताना, हल्लीच्या जिम्समध्ये जाणार्‍या मुलांचे आपल्या आरोग्यसुधारणेतील महत्त्वाच्या घटकाकडे कसे दुर्लक्ष होते, तिकडे लक्ष वेधतात. जीवनाच्या शर्यतीत मागे पडायचे नसेल, तर ‘स्मार्टनेस’ असणे खूप गरजेचे असते. पण आम्ही अनेकदा ह्या बाबतीत चुकीच्या समजुती करून घेतो. एकतर अनेकदा स्वत:लाच ‘स्मार्ट’ समजतो किंवा इतरांना स्मार्ट समजून, आमच्याकडे त्यांच्यासारखा स्मार्टनेस नाही, ह्याची खंत करत बसतो. अनेकदा सौंदर्यालाच ‘स्मार्टनेस’ समजतो. ह्या सर्व समजुतींना छेद देत सद्गुरु बापू इथे आम्हाला ‘स्मार्टनेस’ची खरीखुरी व्याख्या समजावून सांगतात व शरीरातील ‘पोटर्‍या’ ह्या अंगाचा स्मार्टनेसशी कसा जवळचा संबंध आहे ते समजावून सांगतात. त्याचबरोबर ते सैन्यातील ‘मार्चपास्ट’चेही इथे उदाहरण देतात. सैन्यात इतर व्यायामांबरोबरच ‘मार्चपास्ट’ला खूप महत्त्व असते. कारण सैनिकांच्या फिट राहण्याशी त्या मार्चपास्टचा संबंध असतो. कोणी म्हणेल, ‘आम्ही सर्वसामान्य माणसे, आमच्यासाठी त्या मार्चपास्टचा काय उपयोग?’ इथे सद्गुरु अनिरुद्ध जीवनातील खूप मोठे रहस्य समजावून सांगतात. सर्वसामान्य मनुष्य जरी सैनिकांसारखा सीमेवर जाऊन लढणार नसला, तरी त्याच्या रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर तो अनेक लढाया लढतच असतो. त्या लढाया लढण्यासाठी त्याची शस्त्रे कुठली व ती विकसित करण्यामध्ये ह्या पोटर्‍या कशा सहाय्यभूत ठरतात हे ते आपल्या रोजच्या जीवनातल्या विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करतात. इथे पोटर्‍यांचे रक्षण करायला ‘दशमुख रावणाला मारणार्‍या’ रामालाच आवाहन का केले गेले आहे, ते स्पष्ट करताना सद्गुरु बापू ‘प्रत्येकाच्याच जीवनातली सर्वात मोठी लढाई कुठली’ ते समजावून सांगतात आणि त्या लढाईचा रावणाशी कसा जवळचा संबंध आहे, तेही उलगडून सांगतात. सरतेशेवटी, जीवनात केवळ ताकद असून उपयोग नाही, तर जीवनातील कुठलेही युद्ध जिंकण्यासाठी ताकदीच्या जोडीला कुठली गोष्ट आवश्यक आहे, जी हा ‘मर्यादापुरुषोत्तम’ रामच आम्हाला देऊ शकतो, तीदेखील ते समजावून सांगतात. Previous Ramraksha Pravachan -    • रामरक्षा प्रवचन-४९ | आमच्या जीवनातील ‘रामस...   Next Ramraksha Pravachan -    • रामरक्षा प्रवचन-५१ | ‘श्री’प्राप्तीसाठी रा...   #aniruddhabapu #ramraksha #ramrakshapravachan ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------