# 🌿उपवासाचा वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी थोडी वेगळ्या पद्धतीने#
My Routine life
0:00 / 0:00
# 🌿उपवासाचा वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी थोडी वेगळ्या पद्धतीने#
206 просмотров · 3 дн. назад
My Routine life
129 подписчиков
206 просмотров · 3 дн. назад
वरीचा भात बनवण्यासाठी ओलं खोबरं आणि कोथिंबीर सगळ्यात पहिले वाटून घ्यायची. नंतर फोडणी मध्ये तेल किंवा तूप दोन चमचे घालून तेल गरम झाल्यानंतर जिरे हिरवी मिरची चिरलेली आणि वाटण केलेलं खोबरं घालून परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये वरीचे तांदूळ चांगले भाजून घ्यायचं, चांगले भाजल्यानंतर तांदूळ त्यामध्ये गरम पाणी घालून चवीपुरतं मीठ घालून भात चांगला शिजवून घ्यायचा झाकून. आता शेंगदाण्याची आमटी साठी भाजलेले शेंगदाण्याचा कूट करून पाणी घालून दोन चमचे ताक घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचं. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि लाल मिरची पावडर घालून, त्यात दाण्याचा वाटण घालून घ्यायचं आणि चवीपुरते मीठ आणि पाणी घालून एक उकळी काढून घ्यायची नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता तूप गरम करून घ्यायचं दोन चमचे त्यामध्ये काजू थोडे परतून घ्यायचे आणि ते काजू चांगले भाजल्यानंतर वरून घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाला आपला उपवासाचा भात आणि आमटी तयार.