Перейти к содержимому

E19 | विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर मंडळांची बाजू काय? | Shirish Mohite | In Search Of Podcast

In Search Of - Podcast

0:00 / 0:00

E19 | विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर मंडळांची बाजू काय? | Shirish Mohite | In Search Of Podcast

5 382 просмотра · 4 дня назад
In Search Of - Podcast
495 подписчиков
5 382 просмотра · 4 дня назад
🎙️ Episode 19: सेवा मित्र मंडळचे अध्यक्ष Shirish Mohite पुण्यातील गणेशोत्सव, DJ, लाऊडस्पीकर आणि ध्वनिप्रदूषणावरून सध्या मोठी चर्चा सुरू आहे. पण या वादाकडे गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून पाहिलं तर चित्र नेमकं कसं दिसतं? या संवादात शिरीष मोहिते विद्यानंद बापटांच्या भूमिकेपासून सुरू झालेल्या या चर्चेवर आपली बाजू मांडतात. सुरुवातीला DJ आणि कर्कश आवाजाच्या विरोधातील मुद्दा योग्य वाटला, पण त्यानंतर चर्चा नेमकी कुठे बदलली? सार्वजनिक गणेशोत्सवाची आजही गरज आहे का? आणि गणेश मंडळं खरंच समाजासाठी काय काम करतात? याचबरोबर त्यांच्या आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक आहे — बारावी नापास असतानाही गणेश मंडळामुळे मिळालेला आत्मविश्वास, रिक्षा चालवण्यापासून बँकेत काम करण्यापर्यंतचा प्रवास, वसुलीचं काम, 29 वर्षांचा व्यवसाय आणि सामाजिक कामाची अनेक दशकांची वाटचाल. गणेश मंडळाच्या माध्यमातून उपेक्षित कामगारांचा सन्मान, अनाथ मुलांना तीन दिवस आपल्यासोबत ठेवण्याचा 27 वर्षांचा उपक्रम, अंध मुलींची लग्नं, अपंग जवानांचा सन्मान, कोरोनाच्या काळात ऑनलाइन गणेशोत्सव, सायकल संकलन आणि इतर अनेक उपक्रम यामागच्या कथा या संवादातून समोर येतात. आणि शेवटी येतो एक साधा पण प्रभावी विचार — फक्त बोलत राहण्यापेक्षा काम करून दाखवणं महत्त्वाचं. Timestamps 00:00 — Highlights & Introduction 03:46 — गणेशोत्सव, DJ आणि सध्याचा वाद 10:49 — संघर्षमय बालपण, आईची शिस्त आणि आयुष्याची सुरुवात 17:09 — सेवा मित्र मंडळाचा इतिहास आणि गणेशोत्सवातून मिळालेलं शिक्षण 24:43 — उपेक्षित कामगारांचा सन्मान, अनोखे सामाजिक उपक्रम आणि शवपेटीची गोष्ट 30:31 — DJ आणि Loudspeaker वर शिरीष मोहितेंची भूमिका 39:16 — विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर शिरीष मोहिते काय म्हणतात? सार्वजनिक गणेशोत्सवाची गरज का? 45:07 — अनाथ मुलं, अंध मुली आणि अपंग जवानांसाठी सुरू असलेलं सामाजिक कार्य 53:00 — पूर्वीचा गणेशोत्सव, आजचा बदल आणि कार्यकर्त्यांसमोरील अडचणी 1:01:11 — “सगळ्यांना नेतृत्व करायचं, कार्यकर्ता कोणालाच व्हायचा नाही” आणि बदलता गणेशोत्सव 1:07:57 — “बोल बच्चन नाही, काम करून दाखवायचं” | आयुष्याकडे मागे वळून पाहताना 📲 In Search Of — Instagram   / insearch.of_   🎙️ In Search Of — Marathi Podcast नवीन Episodes प्रत्येक Weekend ला. #vidyanandbapat #ganeshotsav2026 #puneganeshotsav #punedjs #ganeshotsav #ShirishMohite #marathipodcast #InSearchOfPodcast #marathi #punenews #ganpati #ganeshmandal