गर्भावस्थेतील भीती आणि चिंता कमी करण्यासाठी विवेकी ध्यान | Dr. Amit's CORE Inner Work
Dr Amit Karkare
0:00 / 0:00
गर्भावस्थेतील भीती आणि चिंता कमी करण्यासाठी विवेकी ध्यान | Dr. Amit's CORE Inner Work
312 просмотров · 3 дн. назад
Dr Amit Karkare
11,7 тыс. подписчиков
312 просмотров · 3 дн. назад
गर्भावस्था हा केवळ शरीरात होणारा बदल नाही, तर एका स्त्रीच्या आयुष्यातील एक खोल आणि सुंदर अंतर्मनाचा प्रवास आहे.या काळात आनंद, उत्सुकता आणि प्रेमासोबत अनेक प्रश्नही मनात येतात...
“बाळाची वाढ नीट होईल ना?”
“प्रसूती व्यवस्थित होईल ना?”
“आई झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या मला झेपतील ना?”
“मी चांगली आई होईन ना?”
या प्रश्नांमागे अनेकदा प्रेम असते, पण त्यासोबत भविष्याबद्दलची अनिश्चितता आणि भीतीही असू शकते.
या Pregnancy CORE Inner Work Meditation मध्ये त्या भावनांना दाबून न ठेवता, त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ध्यान तुम्हाला हळूहळू
भीतीपासून विश्वासाकडे,
अस्वस्थतेपासून स्थैर्याकडे,
नियंत्रणाच्या गरजेपासून स्वीकाराकडे
आणि “मला हे सगळे झेपेल ना?” या प्रश्नापासून “मी एकावेळी एक पाऊल घेऊ शकते” या भावनेकडे घेऊन जाते.
या ध्यानातील एक महत्त्वाचा भाग आहे “मुलगी ते आई” हा नैसर्गिक प्रवास.
हे ध्यान गर्भावस्थेतील भावनिक स्थैर्य, शांतता आणि अंतर्मुखतेसाठी आहे. हे वैद्यकीय उपचार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याचा पर्याय नाही. गर्भावस्थेशी संबंधित कोणतीही वैद्यकीय चिंता असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
CORE Inner Work ही अंतर्मुख प्रक्रियेकडे पाहण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये आपल्या भावनिक आणि वर्तनात्मक patterns च्या मुळाशी जाऊन त्यांच्याकडे अधिक जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला जातो.
Dr Amit Karkare
CORE Inner Work
#PregnancyMeditation #PregnancyMindfulness #PregnancyAnxiety #PrenatalMeditation #PregnancyWellness #MotherhoodJourney #COREInnerWork #GuidedMeditation #PregnancySupport #DrAmitKarkare
#गर्भावस्था #गर्भावस्थेतीलध्यान #गर्भावस्थेतीलभीती #गर्भसंस्कार #आईपण #मुलगीतेआई #गर्भवतीमहिला #शांतता #स्थैर्य #विश्वास