दक्षिणा फंड प्रकरण | सावित्रीबाई जोतीराव फुले
Marathi Warasa - History и Marathi Warasa - Clips
0:00 / 0:00
दक्षिणा फंड प्रकरण | सावित्रीबाई जोतीराव फुले
84 388 просмотров · 3 нед. назад
Marathi Warasa - History и Marathi Warasa - Clips
84 388 просмотров · 3 нед. назад
पुण्यातलं दक्षिणा फंड प्रकरण कितीजणांना माहिताय? शहरातल्या ब्रह्मवृंदांना सरकारी तिजोरीतून मिळणारा पैसा ज्याला जोतीराव फुल्यांनी कडाडून विरोध केला होता.
तो फंड म्हणजे दक्षिणा फंड. गंमत म्हणजे दक्षिणा फंडातलीच काही रक्कम पुढे फुल्यांच्या शाळेला मदत म्हणून मिळू लागली होती बरका.
याच्या मागे होता एक गोरा अधिकारी. मेजर थॉमस कँडी. हा माणूस होता ब्रिटिश पण संस्कृत आणि मराठी भाषांवर इतर कोणाही पेक्षा जबरदस्त पकड. विश्राम बाग वाड्यात त्या काळी संस्कृत कॉलेज होतं. त्या कॉलेजचे हे कँडी साहेब प्रमुख होते.
इतकंच नाही, आपण मराठी भाषेत आजही जी विराम चिन्हे वापरतो, ती विरामचिन्हे याच कँडी साहेबाने मराठीला दिली बरका. इतका हा माणूस मराठी व्याकरणावर जीवापाड प्रेम करायचा.
शहराच्या पूर्व भागात जोतीराव फुल्यांनी मुलींसाठी आणि त्याच्याही पुढे जाऊन खालच्या समाजातील मुलांसाठी शाळा काढल्याचे कळल्यावर भलता खुश झाला हा कँडी साहेब. शाळेला पुस्तके आणि अन्य साहित्य पुरवायचे ते. याच साहेबांनी पुढे सरकारकडे शिफारस केली, की जोतीरावांच्या शाळेला मदत करायला हवी.
सरकारने ही शिफारस मान्य केली आणि दक्षिणा फंडातला पैसा जोरीरावांच्या शाळेकडे वळवला गेला. याच कँडी साहेबांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात जोतीराव फुल्यांचा सत्कार झाला आणि त्यांनी जोतीरावांच्या खांद्यावर शालजोडी टाकली होती.
कितीजणांना माहीत आहे जोतिरावांचा आणि कँडी साहेबांचा हा इतिहास. मराठी वारसा चॅनेल वर सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका बघत रहा... हे असे खूप बारकावे येणार आहेत, पुढे!!
आजच ‘मराठी वारसा’ YouTube चॅनलला Subscribe करा.
आणि सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका सुरुवातीपासून पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
• सावित्रीबाई जोतीराव फुले | मराठी मालिका | ...
#SavitribaiJyotiraoPhule #savitribaijotiraophule #MarathiWarasa #SavitribaiPhule #JyotiraoPhule #WomenEducation #MahatmaPhule #MarathiHistory #SocialReform #MarathiSerial #MarathiWarasaOfficial #amolkolhe #स्त्रीशिक्षण #सावित्रीबाईफुले #सावित्रीबाईजोतीरावफुले #महात्माजोतीरावफुले #मराठीवारसा #इतिहास #क्रांती #शिक्षण #मराठीमालिका