फलटणचा चेहरामोहरा बदलणार! रणजितदादांची सर्वात मोठी घोषणा... पाहा व्हिडिओ
Sthairya
0:00 / 0:00
फलटणचा चेहरामोहरा बदलणार! रणजितदादांची सर्वात मोठी घोषणा... पाहा व्हिडिओ
13 326 просмотров · 3 недели назад
Sthairya
27,8 тыс. подписчиков
13 326 просмотров · 3 недели назад
फलटण शहराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार! शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा धडाका सुरू असून, आगामी काळात शहरात मोठे बदल पाहायला मिळतील.
फलटण शहरात नुकताच 'नमो उद्यान' या भव्य प्रकल्पाचा दिमाखदार शुभारंभ पार पडला. या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (रणजितदादा) यांनी नागरिकांशी संवाद साधत शहराच्या विकासाचा नवा रोडमॅप मांडला आणि विरोधकांवर जोरदार निशाणाही साधला.
शहराच्या विकासासाठी अनेक जागा आरक्षित होत्या, मात्र काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या जागांवर आरक्षण उठवून तिथे मोठे कॉम्प्लेक्स उभे केले, असा थेट आणि गंभीर आरोप रणजितदादांनी केला. जर शहरात पुरेशी जागा उपलब्ध असती, तर यापेक्षाही भव्य प्रकल्प आणि उद्याने उभी राहिली असती, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या उद्यानात लहान मुलांच्या वाढदिवसासाठी आणि छोट्या कार्यक्रमांसाठी 'अॅम्पीथिएटर' उभारण्याची सूचनाही त्यांनी केली.
सध्या फलटण शहरातील प्रत्येक प्रभागात शेकडो कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. महिलांसाठी विशेष जिम आणि योगा सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे, केंद्र सरकारकडून नव्याने ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातून येत्या ४ ते ६ महिन्यांत दर्जेदार रस्त्यांची कामे सुरू होतील, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. राजकारणात विरोधक टीका करत राहतील, पण डोळ्यांना दिसणारा विकास लोक कधीही विसरू शकत नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून फलटण शहराचा सर्वांगीण विकास होईल, अशी ग्वाही रणजितदादांनी दिली. विकासकामांचा हा संपूर्ण लेखाजोखा या व्हिडिओमध्ये नक्की पाहा.
👉 संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👉 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
👉 ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.
👉 अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी Follow करा.
📲 आमच्या WhatsApp चॅनेलला आजच जॉईन व्हा आणि सर्वात आधी ताज्या घडामोडी मिळवा:
https://whatsapp.com/channel/0029VbAq...
#TrendingMaharashtra
#NamoUdyan
#RanjitsinhNaikNimbalkar
#MarathiNews
#Phaltan