Перейти к содержимому

"नावात राम असून चालत नाही, मनातही राम हवा!" रणजितदादांचा रामराजेंवर मोठा प्रहार...

Sthairya

0:00 / 0:00

"नावात राम असून चालत नाही, मनातही राम हवा!" रणजितदादांचा रामराजेंवर मोठा प्रहार...

19 464 просмотра · 11 дней назад
Sthairya
27,8 тыс. подписчиков
19 464 просмотра · 11 дней назад
"फक्त नावामध्ये राम असून चालत नाही, मनात सुद्धा राम असणे आवश्यक आहे!" माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या एका वाक्याने फलटणच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील नाईकबोमवाडी येथे धोम-बलकवडी कॅनॉलच्या बंदिस्त नलिकेचे भूमिपूजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. रणजितदादांनी अत्यंत गंभीर आरोप करत सांगितले की, नाईकबोमवाडीत एमआयडीसी (MIDC) होऊ नये म्हणून रामराजेंनी शासनाकडे प्रयत्न केले आणि बैठका घेतल्या. "ही गोष्ट खोटी असेल तर मी चौकात फाशी घ्यायला सुद्धा तयार आहे," असे थेट आणि खुले आव्हानच त्यांनी यावेळी दिले. तसेच, "ज्या विकासकामांना रामराजे अशक्य किंवा 'आठवे आश्चर्य' म्हणतात, ती कामे १०० टक्के पूर्ण होतात हा आपल्या तालुक्याचा इतिहास आहे," असा टोलाही त्यांनी लगावला. फलटणच्या विकासासाठी आपण सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. अगदी ज्यांनी पूर्वी आपले पुतळे जाळले, तेही आज विकासाच्या ध्येयाने आपल्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी फलटण तालुका विकासासाठी दत्तक घेतला असून ते निधीची कोणतीही कमतरता पडू देत नाहीत, असा विश्वास रणजितदादांनी व्यक्त केला. यावेळी आमदार सचिन पाटील यांनीही विकासाचा मुद्दा अधोरेखित केला. ज्या गावांनी किंवा वस्तीने मतदान केले नाही, तिथेही विकासकामे करण्याच्या स्पष्ट सूचना रणजितदादांनी दिल्या आहेत, असे ते म्हणाले. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेला पाडेगाव-शिंगणापूर सिमेंट रस्त्याचे काम येत्या काही महिन्यांत सुरू होईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. याप्रसंगी माणिकराव सोनवलकर आणि श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर यशवंत कारंडे यांनी प्रास्ताविक केले. रणजितदादांचा हा आक्रमक घणाघात नक्की ऐका. 👉 संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 👉 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 👉 ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. 👉 अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी Follow करा. 📲 आमच्या WhatsApp चॅनेलला आजच जॉईन व्हा आणि सर्वात आधी ताज्या घडामोडी मिळवा: https://whatsapp.com/channel/0029VbAq... #TrendingMaharashtra #RanjitsinhNaikNimbalkar #RamrajeNaikNimbalkar #MarathiNews #Phaltan