Перейти к содержимому

३० वर्षांच्या अनुभवातून डॉ. शोना नाग यांनी मांडलेले कॅन्सरचे सत्य | Dr. Shona Nag | Woman Ki Baat

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

३० वर्षांच्या अनुभवातून डॉ. शोना नाग यांनी मांडलेले कॅन्सरचे सत्य | Dr. Shona Nag | Woman Ki Baat

15 803 просмотра · 21 час назад
आरपार | Aarpaar
294 тыс. подписчиков
15 803 просмотра · 21 час назад
Woman Ki Baat With Dr. Shona Nag Episode: 133 कॅन्सर होतो, म्हणजे नेमकं काय होतं? इथपासून गोंधळ सुरू होतो. मग कोणी सांगतं मेकअपमुळे कॅन्सर होतो, तर कोणी म्हणतं दूध पिणं बंद करा! Clickbait आणि Virality च्या नादात कॅन्सरबद्दल नेहमीच अपूर्ण आणि गोंधळ निर्माण करणारी माहिती समोर येते. डॉ. शोना नाग यांचा हा पॉडकास्ट म्हणूनच ऐकला पाहिजे. या विषयातील त्यांचा अनुभव ३० वर्षांपेक्षा अधिक आहे. कॅन्सरच्या उपचारपद्धतीत झपाट्याने झालेल्या बदलांच्या त्या साक्षीदार आहेत. 'स्टेज ४ कॅन्सर' म्हटलं की सगळं संपलं, असं आता राहिलं नाही; असं त्या सांगताहेत. कॅन्सरसंबंधी असणारे गैरसमज - जसे की केसांना रंग लावू नका, महिलांनी अमुक कपडे घालू नयेत - हा मुद्दा तर त्यांनी अतिशय सुरेख मांडला आहे. 'आरपार वूमन की बात'मध्ये डॉ. शोना नाग यांच्याशी साधलेला हा खास संवाद प्रत्येकाने ऐका आणि आपल्या जवळच्यांना शेअर करायला विसरू नका. What actually happens when someone gets cancer? The confusion starts right at the beginning. In the race for clickbait and virality, the internet is flooded with incomplete and misleading information from claims that "makeup causes cancer" to advice like "stop drinking milk entirely!" This is precisely why you must watch this crucial episode of Aarpaar Woman Ki Baat featuring renowned oncologist Dr. Shona Nag. With over 30 years of clinical experience in oncology, Dr. Shona Nag has witnessed the rapid evolution of cancer treatments firsthand. In this insightful conversation, she explains why a Stage 4 Cancer diagnosis no longer means the end of hope and brilliantly debunks everyday myths from hair dyes and clothing choices to diet and lifestyle habits. Watch this powerful masterclass on cancer awareness, and share this vital information with your family and loved ones! HOST'S Ashwini Teranikar And Mugdha Godbole GUEST Dr. Shona Nag Disclaimer | अस्वीकरण या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती, संवाद आणि मनोरंजन हा आहे. तसेच, आमच्या कोणत्याही पॉडकास्टदरम्यान होस्ट किंवा पाहुण्यांकडून व्यक्त करण्यात आलेली मते, माहिती आणि विचार हे केवळ सर्वसाधारण माहिती व चर्चेच्या उद्देशाने मांडलेले आहेत. कोणतीही सामाजिक, राजकीय किंवा अन्य भूमिका ही संबंधित वक्त्यांची वैयक्तिक बाब असून, ती चॅनेल, संचालक, निर्माते आणि कंपनीची अधिकृत भूमिका नाही. पाहुणे किंवा पॅनेलिस्ट यांनी मांडलेल्या माहितीची सत्यता, स्रोत किंवा अचूकता यांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली असेलच असे नाही. त्यामुळे या माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आवश्यक ती पडताळणी करावी. कोणत्याही माहितीच्या अचूकतेची किंवा वैधतेची हमी चॅनेल किंवा निर्माते घेत नाहीत. कोणतेही विधान किंवा विचार कोणत्याही व्यक्ती, जात, धर्म, लिंग, समुदाय, वंश किंवा सामाजिक समूहाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने मांडलेले नाहीत. तसेच, कोणत्याही संस्था, राजकीय पक्ष, राजकारणी किंवा नेत्याचा अपमान, बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. 00:00 – PROMO 01:33 – डॉ. शोना नाग यांचे स्वागत आणि परिचय 03:38 – कर्करोगावर आज प्रभावी उपाय आहेत का? 07:34 – ऑन्कोलॉजी क्षेत्राची निवड 11:25 – भारतात क्लिनिकल ट्रायल्स 15:30 – कर्करोग म्हणजे नेमके काय? 18:13 – तरुणांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि जीवनशैली 20:45 – लठ्ठपणा, आहार, व्यायाम आणि कर्करोगापासून बचाव 22:42 – महिला व पुरुषांमधील स्तनाचा कर्करोग आणि अनुवांशिकता (BRCA Gene) 24:28 – सौम्य (Benign) आणि घातक (Malignant) गाठींमधील फरक 26:03 – कर्करोगाची आकडेवारी: भारत विरुद्ध पाश्चात्त्य देश 29:41 – महिला आणि पुरुषांमध्ये आढळणारे प्रमुख कर्करोग 31:43 – गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) आणि HPV लस 33:50 – पर्सनलाइज्ड लस आणि टार्गेटेड उपचारांचे भविष्य 35:38 – नियमित तपासणीचे महत्त्व (Pap Smear आणि Mammography) 37:06 – कर्करोगाचे विविध टप्पे (Stage 1 ते Stage 4) 39:31 – गैरसमज विरुद्ध सत्य (हेअर डाय, डिओड्रंट्स, दूध आणि साखर) 42:07 – अंतःस्रावी संस्था (Endocrine System), हार्मोन्स आणि प्रतिकारशक्ती 44:32 – केमोथेरपी कशी काम करते आणि तिचे दुष्परिणाम 47:36 – इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीमधील क्रांती 50:11 – आर्थिक नियोजन आणि कॅन्सर हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व 50:51 – आयुर्वेद आणि होमिओपॅथीची भूमिका 54:00 – कॅन्सर सपोर्ट ग्रुप्स आणि मानसिक आरोग्याची गरज 56:20 – ऑन्कोलॉजिस्ट म्हणून भावनांवर नियंत्रण: वेदांत आणि मानसिक संतुलन 01:00:17 – रोबोटिक सर्जरी आणि ऑन्कोलॉजीमध्ये AI ची भविष्यातील भूमिका 01:02:10 – कॅन्सर उपचारांचे भविष्य आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः https://www.lokmanyasociety.org/?utm_... 🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations: YouTube: / @aarpaar4533 Instagram: / aarpaar.online Threads: https://www.threads.com/@aarpaar.online Facebook: / 1fpykrmzgu Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5... Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh... #Aarpaar #आरपार #AarpaarPodcast #TrendingPodcast #Aarpaar #WomanKiBaat #CancerAwareness #DrShonaNag #AarpaarPodcast #BreastCancerAwareness #CervicalCancer #HPVVaccine #CancerPrevention #CancerTreatment #Chemotherapy #Immunotherapy #Oncology #MarathiPodcast #HealthPodcast #कॅन्सर #आरोग्य