Перейти к содержимому

या देशाच्या बायांना..{क्रांतीचा एक जिवंत दस्तावेज}/लोकशाहीर आत्माराम साळवे/ कैलास जाधव

Kailas Jadhav

0:00 / 0:00

या देशाच्या बायांना..{क्रांतीचा एक जिवंत दस्तावेज}/लोकशाहीर आत्माराम साळवे/ कैलास जाधव

44 169 просмотров · 4 мес. назад
Kailas Jadhav
3,54 тыс. подписчиков
44 169 просмотров · 4 мес. назад
१९७० आणि १९८० चा दशक हा महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात सामाजिक चळवळींनी पेटलेला काळ होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामंतराची चळवळ ऐन भरात होती. या काळात शाहीर आत्माराम साळवे हे चळवळीचे मुख्य सांस्कृतिक दूत बनले. त्यांनी केवळ मनोरंजनासाठी गाणी लिहिली नाहीत, तर ती शोषणाविरुद्ध लढण्याचे हत्यार म्हणून वापरली. या देशातील महिलांना एका बाजूला जातीव्यवस्थेचा आणि गरिबीचा फटका बसत होता, तर दुसऱ्या बाजूला पुरुषप्रधान संस्कृतीचा जुलूम सहन करावा लागत होता. शेतात राबणाऱ्या, डोक्यावर पाटी वाहणाऱ्या आणि घराघरांत कष्ट उपसणाऱ्या स्त्रियांचा खरा संघर्ष शाहिरांनी अत्यंत जवळून पाहिला होता. तोच आक्रोश त्यांनी "या देशाच्या बायांना..." मधून मांडला. "या देशाच्या बायांना..." हे केवळ एक गाणे नसून तो शोषित महिलांच्या वेदनेचा, त्यांच्या कष्टाचा आणि पर्यायाने त्यांच्या क्रांतीचा एक जिवंत दस्तावेज आहे. शाहिर आत्माराम साळवे यांनी आपल्या लेखणीतून आणि डफाच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मानाची नवीन वाट दाखवली. म्हणूनच आजही कोणत्याही सामाजिक किंवा महिला हक्कांच्या आंदोलनात हे गीत अत्यंत आदराने आणि ऊर्जेने गायले जाते. माझी भूमिका, "जी गाणी जगातील गरीब, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वंचितांना न्याय देतात, त्यांच्या दुःख-वेदना मांडतात; तीच गाणी खऱ्या अर्थाने जगातील सर्वात सुंदर गाणी असतात." हा केवळ माझा विचार नाही, तर माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या संपूर्ण सांगीतिक चळवळीचा जिवंत जाहीरनामा आहे! मी कैलास जाधव— एक कलावंत, पण त्याही आधी सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवर चालणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता! आजच्या डिजिटल युगात, आपल्या क्रांतिकारी महापुरुषांचे विचार आणि चळवळीचा सांस्कृतिक वारसा काळाच्या पडद्याआड जाऊ नये, म्हणून मी 'पारंपरिक लोकसंगीत आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता' यांची एक अभूतपूर्व जुगलबंदी घडवून आणत आहे.माझा हा लढा केवळ करमणुकीसाठी नाही, तर तो इतिहासातील धगधगता संघर्ष आणि वर्तमानातील आक्रोश नव्या पिढीच्या भाषेत मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मी आतापर्यंत निर्माण केलेल्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या प्रत्येक कलाकृतीमागे एक प्रखर सामाजिक भूमिका आहे: मी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जागतिक पुरस्कार विजेत्या वर्षाताई देशपांडे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे. ध्वनी संयोजन आणि गायकी - मी स्वतः ही गाणी संपूर्ण गातो आणि रेकॉर्ड करतो. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या (Auto-tune ) साहाय्याने गाण्याचा पोत अधिक प्रभावी करतो. गाण्याच्या गरजेनुसार गायकाचे वय काय असावे, आवाज स्त्रीचा असावा की पुरुषाचा, आणि तो किती खणखणीत असावा, हे सर्व मी स्वतः तांत्रिकदृष्ट्या निश्चित करतो. जरी मी आज अत्याधुनिक 'Hi-Fi' ऑडिओ, 'Dolby Atoms' आणि '8D Spatial Audio' यांसारख्या प्रगत जागतिक तंत्रज्ञानावर काम करत असलो, तरी माझी नाळ जमिनीशीच जोडलेली आहे. आजही मैदानावर उतरताना माझ्या एका हातात डफ आणि दुसऱ्या हातात परिवर्तनाचा निळा-क्रांतिकारी झेंडा असतो! तंत्रज्ञान हे माझ्यासाठी केवळ एक माध्यम आहे, पण गाण्यांमागची खरी ऊर्जा ही आपल्या गरीब, वंचित, शोषित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या शतकानुशतके चालत आलेल्या संघर्षाची आहे! जय भीम! जय क्रांती! जय जगात – तुमचा नम्र सहप्रवासी, कैलास जाधव (कलावंत व कार्यकर्ता) जर हे गाणं मनाला भिडलं असेल तर LIKE 👍 | SHARE 🔁 | SUBSCRIBE 🔔 करा हि गाणी म्हणजे आवाज आहे… अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या प्रत्येकासाठी. समाज बदलण्यासाठी, एकजूट, संघर्ष आणि आशा यांचा हा संगीतात्मक प्रवास आहे. हे गाणं सामाजिक चळवळी मध्ये ज्यांनी आपले आयुष्य लोकांसाठी वाहिले त्या सगळ्या परिवर्तनवादी कार्यकर्त्याला हि गाणी समर्पित आहे. ज्यांनी या गाण्यांचा प्रत्येक शब्द लिहून इथल्या सोशितांचे दुख,वेदना,मांडून लढण्याचे बळ दिले त्या माझ्या लोकशाहिरांना हि गाणी समर्पित आहे. ✊ बदल शक्य आहे, ✊ फक्त आवाज उठवण्याची गरज आहे. जर हे गाणं मनाला भिडलं असेल तर LIKE 👍 | SHARE 🔁 | SUBSCRIBE 🔔 करा #SocialMovement #MarathiSong #SamajParivartan