Перейти к содержимому

NANDURBAR | दुष्काळात शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही! चंद्रकांत रघुवंशींची महावितरणला तंबी

M Today Network

0:00 / 0:00

NANDURBAR | दुष्काळात शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही! चंद्रकांत रघुवंशींची महावितरणला तंबी

164 просмотра · 1 день назад
M Today Network
866 подписчиков
164 просмотра · 1 день назад
Anchor :- नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळाच्या संकटात सापडले असताना शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दररोज सहा तास वीजपुरवठा देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात अखंडित वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या वतीने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित या मेळाव्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासमोर मांडल्या. यावेळी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना अखंडित सहा तास वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मांडली. दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही. शासनाने दिलेल्या आश्वासनांची आणि सुविधांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, त्यांच्या अडचणी वाढवू नयेत, अशी तंबीही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी शासन आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना अखंडित सहा तास वीजपुरवठा देण्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. #nandurbar #mtodaynetwork #chandrkanraghuvanshi #maharashtra #news #mumbai #nandurbarnews #dushkal #shivsena #today #mtodaynetwork