Перейти к содержимому

१७१.सत्र १ - भगवद्गीता अध्याय ८ श्लोक १ ते ४ - आ.सौ.मुक्ताताई वाळवेकर - २२ ऑक्टोबर २६

Shivgad Pariwar

0:00 / 0:00

१७१.सत्र १ - भगवद्गीता अध्याय ८ श्लोक १ ते ४ - आ.सौ.मुक्ताताई वाळवेकर - २२ ऑक्टोबर २६

2 416 просмотров · 1 дн. назад
Shivgad Pariwar
5,49 тыс. подписчиков
2 416 просмотров · 1 дн. назад
अभ्यास वर्ग क्रमांक १७१ = भगवद्गीता अध्याय ८ आणि ९ मार्गदर्शक / प्रवचनकार - आ.सौ.मुक्ताताई वाळवेकर दिनांक - २२ ते २५ ऑक्टोबर २६ सत्र १ : - दिनांक - २२ ऑक्टोबर २६ विषय : भगवद्गीता अध्याय ८ - श्लोक १ ते ४ आयोजक - शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट. स्थळ - शिवगड श्रीकृष्णनगरी, मुरगुड. भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायातील ‘अक्षरब्रह्मयोग’ या विषयाच्या प्रारंभी पहिल्या श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ या संकल्पनांचे स्वरूप स्पष्ट करून सांगतात. या विवेचनातून नाशिवंत आणि अविनाशी यांतील भेद समजून घेण्याची दिशा साधकाला मिळते. शरीर आणि दृश्य जग नाशिवंत असले, तरी त्यामध्ये व्यापून राहिलेले चैतन्य हेच आत्मतत्त्व आहे. नाशिवंत कर्माचा अभिमान न धरता आपले विहित कर्म चोखपणे करावे, त्याचा अहंकार न बाळगता ते भगवंतांना समर्पित करावे, हा या चिंतनाचा महत्त्वपूर्ण संदेश आहे. ‘अन्ते मतिः सा गतिः’ या सिद्धांतानुसार, मृत्युसमयी ज्या भावाचे चिंतन होते, त्यानुसार पुढील गती प्राप्त होते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सतत भगवंतांचे स्मरण करीत आपले कर्तव्य पार पाडण्याचा उपदेश करतात. सहाव्या आणि सातव्या अध्यायातील मनःसंयम, चित्तस्थैर्य आणि ईश्वरचिंतन यांचा धागा आठव्या अध्यायातही पुढे येतो. अभ्यासाच्या साहाय्याने चित्त स्थिर करून दिव्य परमपुरुषाचे अखंड चिंतन केल्यास साधक त्या परमस्वरूपाला प्राप्त होतो. नाशिवंताच्या मोहातून बाहेर पडून अविनाशी आत्मतत्त्वाचे चिंतन करणे, कर्म भगवंतांना समर्पित करणे आणि अखंड ईश्वरस्मरणात राहणे, हीच या प्रवचनातून मिळणारी साधनेची दिशा आहे. #drshrikrishnadeshmukh #shivgadpariwar #shivgadadhyatmcharitabletrust #dnyaneshwari #bhawarthdipika #ज्ञानेश्वरी #भावार्थदीपिका #संतज्ञानेश्वर #शिवगड #naam #naamjap #naamsadhana #appliedparamarth #muktawalvekar #pramodwalvekar #bhagavadgita #bhagavadgitachapter8 @SadhanaVichar @anandachedohi @paramanand9466 @shrikrupaprakashan @shrikrupaprakashan8172 @alkamutalik1640 @vedantbhaskar ⁨@चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा⁩ ⁨@AdvaitChintan