गणपती बाप्पासाठी नैवेद्य उकडीचे मोदक
prajaktachi fule
0:00 / 0:00
गणपती बाप्पासाठी नैवेद्य उकडीचे मोदक
167 просмотров · 7 дн. назад
prajaktachi fule
305 подписчиков
167 просмотров · 7 дн. назад
उकडीचे मोदक रेसिपी
उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाची वाफेवर उकड काढून त्यात सारण भरून मोदक वाफवून घेतले जातात.
साहित्य:
सारणासाठी: १ कप किसलेला ओला नारळ, ½ कप गूळ, १ चमचा खसखस, ½ चमचा वेलची पूड, १ चमचा तूप.
उकडीसाठी: १ कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १ चमचा तूप, चिमूटभर मीठ.
कृती:
सारण: कढईत तूप गरम करून खसखस आणि नारळ १ मिनिट परता, नंतर गूळ घालून मिश्रण सुके होईपर्यंत शिजवा व वेलची पूड मिसळा.
उकड: भांड्यात पाणी, तूप आणि मीठ उकळवून त्यात तांदळाचे पीठ घाला; मिक्स करून झाकण ठेवून २ मिनिटे वाफ काढा व नंतर पीठ छान मळून घ्या.
मोदक: पिठाची मध्यम गोळी घेऊन तिची पारी (वाटी) बनवा, त्यात सारण भरा आणि कळ्या पाडून वरच्या बाजूला एकत्र करून मोदकाचा आकार द्या.
वाफवणे: मोदक पात्रात चाळणीला तूप किंवा केळीचे पान लावून मोदक १० ते १२ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. वरून साजूक तूप लावून गरम सर्व् करा..