तेल न खाल्ल्यास सांधे कोरडे पडतात का? सांधेदुखीचं खरं कारण | डॉ अविनाश सावजी
Prayas Amravati
0:00 / 0:00
तेल न खाल्ल्यास सांधे कोरडे पडतात का? सांधेदुखीचं खरं कारण | डॉ अविनाश सावजी
13 274 просмотра · 3 недели назад
Prayas Amravati
7,65 тыс. подписчиков
13 274 просмотра · 3 недели назад
तेल कमी खाल्लं तर सांध्यांचं वंगण संपून सांधे कोरडे पडतात का?
"बिना तेलाची फोडणी" या मागच्या व्हिडिओनंतर अनेकांनी हा प्रश्न विचारला. आज त्याचंच वैज्ञानिक उत्तर.
पिढ्यानपिढ्या आपल्याला सांगितलं गेलंय की सांध्यांचं वंगण तयार होण्यासाठी भरपूर तेल-तूप खाणं गरजेचं आहे. पण विज्ञान वेगळंच सांगतं.
🔬 या व्हिडिओमध्ये:
✅ सांध्यांची रचना आणि वंगण (synovial fluid) नेमकं कशापासून तयार होतं
✅ रिफाइंड तेलाचे शरीरावर होणारे परिणाम
✅ तेलाशिवाय नैसर्गिक फॅट्स कसे मिळवायचे
👉 महत्त्वाचं सत्य:
आपण खातो त्या तेलाचा आणि सांध्यांच्या वंगणाचा काहीही संबंध नाही. वंगण तयार होण्यासाठी लागतं - पुरेसं पाणी, पेशींचं योग्य पोषण, आणि सांध्यांची हालचाल.
उलट तापवलेल्या रिफाइंड तेलात trans fatty acids तयार होतात, जे inflammation आणि arthritis वाढवतात.
🌿 सांध्यांच्या आरोग्यासाठी तीन नियम:
1️⃣ तेलाऐवजी तेलबियांचा (शेंगदाणे, तीळ, जवस, खोबरं) वापर करा
2️⃣ पुरेसं पाणी आणि पाणीयुक्त फळं-भाज्या-सलाड खा
3️⃣ सांध्यांना नियमित हालचाल द्या
हे तीन नियम आयुष्यभर पाळा, आणि सांधे आयुष्यभर लवचिक व निरोगी राहतील.
🎥 हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा.
डॉ. अविनाश सावजी
जीवनशैलीतील बदलांद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशील
📌 सांधेदुखी उपाय | सांध्यांचे आरोग्य | गुडघेदुखी मराठी | arthritis marathi | तेल आणि सांधे | निरोगी आहार मराठी | जीवनशैली बदल
📌 sandhedukhi upay | sandhyanche arogya | gudghedukhi marathi | arthritis marathi | nirogi aahar
#सांधेदुखी #गुडघेदुखी #arthritis #निरोगीआहार #सांध्यांचेआरोग्य #lifestylemedicine #prayasamravati
=====
अन्न परम औषधम ! डॉ अविनाश सावजी
(आपला आहार योग्य असेल तर बहुधा आपल्याला डॉक्टरची गरज भासणार नाही.)
हा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे.
• अन्न परम औषधम ! डॉ अविनाश सावजी (आपला आहार...
=========
डॉ अविनाश सावजी
संचालक, प्रयास, अमरावती.(GMC Nagpur 1978 batch)
सिंदखेडराजासारख्या एका लहानशा गावातून, सामान्य कुटुंबातील डॉ. अविनाश हे 10-12 व्या वर्गात नागपूर बोर्डात गुणवत्ता यादीत होते.
GMC नागपूरला, MBBS अंतिम वर्षात पण पहिल्या 10 मध्ये उत्तीर्ण.
आपल्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमविण्याकरता न करता गरजू लोकांसाठी करायचे ठरवून, पुढचे विद्यापीठाचे शिक्षण थांबविले.
सुरुवातीचे २३ वर्षे छोट्या गावात राहून, आदिवासी व ग्रामीण लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य केले.
आता २६ वर्षांपासून जीवनशैली व आरोग्य या विषयाला घेऊन कार्यरत.
स्वतःच्या अभ्यास व अनुभवाच्या आधारे Preventive Cardiologist, Diabetologist, lifestyle medicine expert अशी लोकांमध्ये ओळख निर्माण केलेली.
अत्यंत प्रभावशाली वक्त␃त्व, संपूर्ण राज्य व देशविदेशातही कमविलेला खूप मोठा लोकसंग्रह,
हजारो तरुणांचे mentor,
अनेक संस्था संघटनांचे मार्गदर्शक,
असे अत्यंत बहुआयामी विचारवंत व अभ्यासू व्यक्तित्व.
हजारो जाहीर व्याख्याने,
५००० पेक्षाही जास्त शाळा महाविद्यालयातील लाखो विद्यार्थी व हजारो शिक्षक - प्राध्यापकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन.
1. सुजाण पालकत्व
2. यशस्वी व्हा
3. जगायचे का व कशासाठी
4. नाती घट्ट करू या
5. राग व अहंकाराचे व्यवस्थापन
6. व्हिजन 2045- वीस वर्षानंतर मी कुठे असेल व तिथे पोहचण्यासाठी आज मला काय करायला पाहिजे
7. शतायुषी व्हा
8. आरोग्यदायी जीवनशैली
अशा विविध जीवनोपयोगी विषयावर शेकडो व्याख्याने - कार्यशाळा - प्रशिक्षणे घेतलेली.
डायबिटीस
ब्लड प्रेशर
थायरॉईड
लठ्ठपणा
अस्थमा
हार्ट अटॅक
गुडघे व पाठदुखी
संधिवात व
इतरही अनेक ऑटो इम्युन आजार
जे एरव्ही कधीच बरे न होणारे व वाढतच जाणारे मानले जातात, ते पण पूर्णपणे रिव्हर्स करता येतात, औषधे बंद करता येतात हे अलीकडील अनेक संशोधनातून सिद्ध झालेले आहे.
अशाच प्रकारचा प्रयोग डॉ अविनाश सावजी व त्यांची टीम, ऑनलाईन पद्धतीने गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत. 4000 पेक्षाही जास्त रुग्णांचे अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत.
आतापर्यंत अमेरिकेसह इतर 16 देशांमधील व आपल्या देशातील 18 राज्यांमधील...
आणि महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांतील हे रुग्ण आहेत.
यामध्ये मिळणारे परिणाम हे कुठल्याही औषधांशिवाय व फक्त जीवनशैलीत काही बदल करून मिळालेले आहेत.
ती आरोग्यदायी जीवनशैली नेमकी काय आहे व तिचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी, कुटुंबीयांसाठी, याबाबत ते विविध कार्यक्रमात मार्गदर्शन करत असतात.
बायपास/अँजिओप्लास्टी न करता, केवळ जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून, हृदयाच्या रक्तवाहिन्यामधील blockages दूर करता येतात, या संशोधनावर आधारित आरोग्यदायी जीवनशैली, गेल्या २५ वर्षात, डॉ. अविनाश सावजी हे लाखो लोकांपर्यंत घेऊन गेले आहेत.
असे करणाऱ्या आपल्या देशातील सुरुवातीच्या काही निवडक डॉक्टरपैकी ते एक आहेत.
-----------
www.prayasngo.net
अधिक माहितीसाठी :
प्रयास हेल्पलाईन क्र. 9021591789
WhatsApp 9420722107
---------
For more information regarding our initiatives, log onto:
http://prayasngo.net/
- - - - - - - - - - - - - - - - - -
Please subscribe to our Channel :
/ @prayasamravati
Connect with Dr. Avinash Saoji at:
-- LinkedIn: https://www.linkedin.com/in/avinash-s...
-- Facebook: / dr.avinashsaojiprayas